कंडोम किंग म्हणून जगभर ओळख, कोण आहे तो? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कंडोम किंग म्हणून जगभर ओळख, कोण आहे तो?

या व्यक्तीच्या वैयक्तिक आयुष्यात असे काही घडले ज्यानंतर त्याने लोकांना एचआयव्ही सारख्या भयानक आजाराविरोधात जागरुकता निर्माण करण्याचा निर्णय घेतला.

कंडोम किंग म्हणून जगभर ओळख, कोण आहे तो?

Condom King of Africa: जगभरामध्ये वाढती लोकसंख्या पाहता लोकसंख्या नियंत्रणासंबधित (population control) कडक उपाययोजना करणे प्रत्येक देशासाठी गरजेचे होत आहे. वाढत्या लोकंसख्या अनिंयत्रित असण्या मागचे एक कारण आहे, लोकांमध्ये जागरुकतेचा अभाव आणि गर्भनिरोधक उपायबाबत अज्ञान असणे. नॅशनल हेल्थ आकडेवारीच्या अहवालानुसार 2011 ते 2015 पर्यंत 15 ते 44 वर्षांपर्यंत फक्त 33.7 टक्के पुरुष कंडोमचा वापर करत होते. अशास्थितीमध्ये कंडोमबाबत लोकांमध्ये संकुचितपणा असतो पण, केनियामधील एक व्यक्ती लोकांच्या मनातील संकोच काढून टाकण्यासाठी (Kenya Man Awarness for Condoms)काम करतो आहे.

हेही वाचा: विक्रम गोखलेंची 10 धक्कादायक वक्तव्यं...; एकदा वाचाच

केनियामध्ये राहाणाऱ्या स्टॅन्ली नगारा (Stanley Ngara )हा व्यक्ती 'किंग' नावाने प्रसिध्द आहे. एक असा 'किंग' जो आपल्या प्रजेला (Man gives free condoms to people) कंडोम वाटतो. संपूर्ण अफ्रिकेमध्ये स्टॅन्ली असा व्यक्ती आहे की, जो 'कंडोम किंग' (Condom king of Kenya) म्हणून ओळखला जातो. नायरोबीच्या गल्ल्यांमध्ये फिरुन प्रत्येक गरजू व्यक्तीला कंडोम वाटप करतो. पण प्रश्न हा आहे तो सर्वांना कंडोम का वाटतो?

अफ्रिकेत गर्भनिरोध वापरा बाबत निर्माण करतोय जागरुकता (Awareness of the spread of contraception in Africa)

स्टॅनलीचे म्हणणे आहे की, ''तो अफ्रिकेतील लोकांमध्ये गर्भनिरोधबाबत जागरुकता निर्माण करत आहे. अफ्रिकेमध्ये दरवर्षी लाखो लोक एचआयव्ही सारख्या आजाराचे शिकार होता. त्यामुळे कित्येक लोकांचे जीव जात आहे. स्टॅनली सोबत देखील अशीच एक घटना घडली होती ज्यानंतर त्यांनी हे चांगले काम करण्याचा निर्णय घेतला. रिपोर्टस् नुसार खूप वर्षांपूर्वी त्यांच्या एका जीवलग मित्राचा एचआयईव्हीमुळे मृत्यू झाला. तेव्हापासून तो राजाप्रमाणे तयार होतो आणि रस्त्यावर फिरुन लोकांना मोफत कंडोम वाटप करतात.

हेही वाचा: मास्क न वापरल्यानं अजितदादांनी रोहित पवारांना झापलं! म्हणाले...

लोकांना लैंगिक संबधांबाबत जागरुक करतात

स्टॅनली फक्त कंडोम वाटण्याचे काम करत नाही तर लोकांमध्ये जागरुकाताही निर्माण करतात. ते केन्यातील झोपडपट्टयांमध्ये जाऊन लोकांना गर्भनिरोध वापरण्याबाबत जागरुक करतात. एचआयईव्ही सारख्या आजारांबाबत माहिती देतात आणि गर्भपात होण्याच्या समस्येबाबत समजावून सांगतात. त्यांचे म्हणणे आहे की, ''ते लोकांना त्या गोष्टी सांगतात की ज्या संकोचित वृत्तीमुळे त्यांचे शिक्षक किंवा कुटंबीय सांगू शकत नाही''

loading image
go to top