esakal | सोशल डिस्टन्सिंगचे निर्बंध शिथिल होतायत; जगात कंडोमचा खप वाढला

बोलून बातमी शोधा

सोशल डिस्टन्सिंगचे निर्बंध शिथिल होतायत; जगात कंडोमचा खप वाढला
सोशल डिस्टन्सिंगचे निर्बंध शिथिल होतायत; जगात कंडोमचा खप वाढला
sakal_logo
By
टीम ई सकाळ

कोरोनाचं संकट सगळ्या मानवजातीसाठीचं नवं होतं. अचानकच दाराशी येऊन ठेपलेल्या या संकटामुळे भीती आणि भरपूर सारे प्रश्न आ वासून उभे राहिले होते. माणसांनी माणसांशी संपर्क ठेवावा तरी कसा इथपासून ते हे सगळं काही सुरळीत होईल ना? इथपर्यंतचे असंख्य प्रश्न भेडसावत होते. सोशल डिस्टन्सिंगचं पालन करताना आपल्याच जोडीदारासोबतच्या सेक्सचं काय? हा गहन प्रश्न या काळात आणि आतादेखील लोकांना पडला आहे. मात्र, एक आनंदाची बातमी यासंदर्भात नक्कीच आपली आशा दुणावेल, यात शंका नाही. कोरोना लॉकडाऊनच्या काळात कंडोमचा सेल झपाट्याने घटला होता. लोक सेक्स करायला देखील घाबरत होते. त्यामुळे कंडोमच्या विक्रीमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर घट झाली होती. मात्र, आता संपूर्ण जगभरात लशीकरणाची मोहिम मोठ्या जोमात सुरु असल्याकारणाने आता कंडोम निर्मात्यांनी देखील आपले आखडते हात सैल सोडले आहेत. आता कंडोमचा सेल वाढताना दिसून येतो आहे.

हेही वाचा: दररोज सेक्स करण्याचे 5 फायदे जाणून घ्या

अमेरिकेमध्ये पुरुषांच्या कंडोमच्या विक्रीमध्ये तब्बल 23.4 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्यावर्षी 2020 मध्येच हा खप 4.4 टक्क्यांनी घसरला होता. ड्युरेक्स कंपनीचे रेकिट बेन्कीझर यांनी गेल्या बुधवारी सांगितलं की गेल्या वर्षीच्या तिमाहीच्या तुलनेत या वर्षाच्या तिमाहीत ड्युरेक्स कंडोमच्या विक्रीत दुप्पट वाढ झाली आहे.2019 साली विक्री फारशी नव्हती. तर नव्या वर्षातील पहिल्या सहामाहीचा काळ आव्हानात्मक असूनही, ड्युरेक्सची विक्री मागील वर्षी वाढलेली दिसून आली. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांमध्ये अलिकडे आणलेल्या शिथिलतेमुळे ही वाढ झाल्याचं त्यांनी म्हटलंय. कंपनीचे सीईओ लक्ष्मण नरसिम्हन यांनी बुधवारी सांगितलं की, ज्या ठिकाणी सामाजिक बंधनं कमी केली जात आहेत अशा ठिकाणी ड्युरेक्स कंडोमच्या विक्रीत सुधारणा होत असल्याचं दिसून येत असल्याचं त्यांनी म्हटलंय. ट्रोजन कंडोमची निर्मिती करणार्‍या चर्च अँड ड्वाइट यांनी जानेवारीत म्हटलंय की, यावर्षी कंडोम विक्रीसाठी परिस्थिती आशादायक दिसत आहेत. कंडोम म्हणजेच थोडक्यात आनंदच! अठरा ते चोविस वर्षे वयाची तरुण पिढी सामाजिक जीवन परत येण्याची प्रतीक्षा करता येत नाही,” असे चिफ मार्केटींग ऑफिसर ब्रिटा बोमहार्ड यांनी म्हटलंय. जागतिक महासाथी दरम्यान कंडोमची विक्री सुस्त झाली होती. आयआरआयच्या आकडेवारीनुसार 2017 मध्ये 2.4 टक्के आणि 2018 मध्ये 3.4 टक्क्यांनी विक्री घसरली होती. तर 2019 मध्ये ती 1.2 टक्क्यांनी वाढली होती.