esakal | दररोज सेक्स करण्याचे 5 फायदे जाणून घ्या

बोलून बातमी शोधा

physical relationship
दररोज सेक्स करण्याचे 5 फायदे जाणून घ्या
sakal_logo
By
टीम-ई-सकाळ

वैवाहिक आयुष्यात जोडप्यांमध्ये प्रेम आणि शारीरिक संबंध असणे साधारण आहे. लग्न झालेल्या काही जोडप्यांना रोज शारीरिक संबंध ठेवणे आवडते, तर काहीजण आठवड्यातून दोन ते तीनवेळा शारीरिक संबंध ठेवतात. शारीरिक संबंध ठेवणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरु शकते. जोडीदारासोबत दररोज शारीरिक संबंध ठेवणे चांगले असते. दररोज शारीरिक संबंध ठेवण्याचे फायदे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

हेही वाचा: कसा असावा कोरोना काळातला सेक्स; तुम्हाला माहित असाव्यात अशा गोष्टी

- एका रिसर्चनुसार, रोमान्स करणे किंवा शारीरिक संबंध ठेवणे एक चांगली एक्सरसाईज आहे. यामुळे शरीरात उर्जा येते, शिवाय यामुळे लठ्ठपणा कमी होता. शारीरिक संबंध ठेवण्यासाठी जवळपास 7500 कॅलरी उर्जा बर्न होत असते.

- शारीरिक संबंध ठेवल्याने शरीरात ऑक्सिटॉसिन आणि अँड्रोफिनसारख्या तत्वांचे निर्माण होते, जेणेकरुन तणाव आणि थकवा दूर होतो.

- शारीरिक संबंध केल्याने हृद्यासंबंधी आजार होण्याचा धोका कमी होतो. तसेच यामुळे ब्लड सर्कुलेशनही चांगल्या पद्धतीने होते.

- शारीरिक संबंध ठेवल्याने शरीरात रोगप्रतिकारक क्षमता वाढते. तसेच यामुळे सांधेदुखी आणि मायग्रेनसंबंधी समस्यांपासून आराम मिळतो.

- ज्या महिलांना पीरियड्स रेग्युलर न होण्याची समस्या आहे, त्यांच्यासाठी शारीरिकसंबंध खूप फायद्याचे ठरते. यामुळे शरीर आणि डोक्याला आराम मिळतो.