संरक्षण कंपन्यांसाठीच वारंवार युद्ध - ट्रम्प

पीटीआय
Wednesday, 9 September 2020

युद्धात हुतात्मा झालेल्या सैनिकांना डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘पराभूत’ असे म्हटल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठत असतानाच त्यांनी आज संरक्षण विभागावर संशय व्यक्त केला आहे.

वॉशिंग्टन - अनेक वेळा टीका होऊनही अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वादग्रस्त विधानांची परंपरा कायम राखली आहे. संरक्षण क्षेत्रातील कंत्राटदारांना खूष ठेवण्यासाठीच संरक्षण विभागाचे नेते जगभरात युद्ध करत असतात, असे विधान त्यांनी काल केले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

युद्धात हुतात्मा झालेल्या सैनिकांना डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘पराभूत’ असे म्हटल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठत असतानाच त्यांनी आज संरक्षण विभागावर संशय व्यक्त केला आहे.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

‘व्हाइट हाऊस’मध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना ट्रम्प म्हणाले की, पेंटॅगॉनमधील काही वरीष्ठ अधिकाऱ्यांना कायम युद्ध करण्याची इच्छा असते. कारण त्यांना बाँब आणि विमाने बनवणाऱ्या कंपन्यांना खूश ठेवायचे असते. आंदोलनांवर नियंत्रण मिळविण्यासाठी सैन्याचा वापर करण्याचा इशारा दिल्यानंतर ट्रम्प आणि लष्करातील अधिकाऱ्यांमध्ये तणाव निर्माण झाला आहे.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Controversial statement by US President Donald Trump