
चीनमध्ये पुन्हा कोरोना; शेंन्झेनमध्ये लॉकडाउन; आयफोनचा कारखाना बंद
बीजिंग : कोरोनाच्या साथीने चीनमध्ये पुन्हा हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. दक्षिण चीनमधील चीनमधील औद्योगिक शहर शेंन्झेनमध्ये कडक लॉकडाउनची घोषणा अध्यक्ष शी जिनपिंग यांनी जाहीर केल्याने शहरातील सुमारे एक कोटी ७० लाख लोकांना आठवड्याच्या पहिल्या दिवशी घरी बसावे लागले.जिल्ह्यात एका दिवसात ६६ लोक कोरोनाबाधित आढळले. शेंन्झेनमध्ये आज १७० रुग्ण आढळल्याने प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे. नवीन रुग्ण आढळल्याने चीनचे कोरोनामुक्त धोरण अपयशी ठरण्याची चिन्हे आहेत.
हा धोका टाळण्यासाठी शांघाय आणि अन्य प्रमुख शहरांमध्येही रविवारी (ता. १३) कोरोनाचे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. शेंन्झेनमधील लॉकडाउनचा फटका कारखान्यांनाही बसला आहे.
सीमेवरील आयफोनसह मोठे उद्योग बंद
हाँगकाँगशी जोडलेल्या औद्योगिक केंद्रांमध्ये ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून कालपासून येथे लॉकडाउन जाहीर करण्यात आला. यामुळे आयफोन निर्मिती करणारा उद्योगही बंद ठेवण्यात आला होता. ॲपल कंपनीची मुख्य पुरवठार कंपनी ‘फॉक्सकॉन’ने म्हटले आहे, की, शेंन्झेनमधील कारखान्यातील सर्व कामे बंद ठेवण्यात आली आहेत. लॉकडाउनमुळे कारखान्यासह सर्व विभागांवर आर्थिक संकट ओढावणार आहे. चीनमध्ये नागरिकांना घरी थांबण्याचा आदेश दिलेल्या दहा शहरापैकी शेंन्झेन एक आहे. या शहरात हुवाई आणि टेन्सेंट या मोठ्या कंपन्यांचेही मुख्य कार्यालय आहे.
उच्चांकी कोरोनारुग्ण
ओमिक्रॉनसारख्या वेगाने उत्परिवर्तीत होणाऱ्या कोरोनाच्या प्रकारामुळे चीनच्या कोरोनामुक्त धोरणाबद्दल चिंताजनक स्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने अजून कडक निर्बंध जाहीर केले जातील, असा इशारा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिला. देशभरात काल कोरोनाचे दोन हजार ३०० रुग्ण आढळले आहेत. परवा ही संख्या तीन हजार ४०० एवढी होती. गेल्या दोन वर्षातील चीनमधील ही उच्चांकी संख्या आहे. शेंन्झेनच्या शहरी व ग्रामीण व औद्योगिक वसाहतीत अनेक लघु उद्योग आहेत.
चीनमध्ये खबरदारी
शांघायमधील शाळा- उद्याने बंद
बीजिंगमध्ये निवासी भागात प्रवेशबंद
नागरिकांना घरात थांबण्याचा आदेश
गरज नसेल तर शहरातून बाहेर न पडण्याची सूचना
अन्य देशांतही फैलाव
हाँगकाँगमध्ये काल कोरोनामुळे ८७ रुग्णांचा मृत्यू झाला
देशात आतापर्यंत तीन हजार ७२९ रुग्णांचा मृत्यू
शहरात एका दिवसात संसर्गबाधितांची संख्या २७ हजार ६४७
दक्षिण कोरियात कोरोना संसर्ग सर्वोच्च पातळीवर
देशात शुक्रवारी (ता.११) तीन लाख ८३ हजार ६५१ एवढी उच्चांकी रुग्णसंख्या
कोरिया रोगनियंत्रण आणि प्रतिबंध संस्थेच्या माहितीनुसार काल २५१ जणांचा कोरोनाने मृत्यू
मलेशियात एका दिवसात कोरोनाचे नवे २६ हजार २५० रुग्ण व ७७ जणांचा मृत्यू
Web Title: Corona Again In China Lockdown Shenzhen Iphone Factory Closed Beijing
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..