coronavirus : न्यूझीलंडला दोन महिन्यांनी रुग्ण

वृत्तसंस्था
Monday, 25 January 2021

ऑकलंडमध्ये दोन आठवड्यांचे विलगीकरण पूर्ण केल्यानंतर दहा दिवसांनी तिला संसर्ग झाल्याचे निदान झाले. या केंद्रातून घरी आल्यानंतर दोन दिवसांनी तिच्यात सौम्य लक्षणे दिसू लागली होती.

वेलिंग्टन - न्यूझीलंडमध्ये दोन महिन्यांहून जास्त काळानंतर कोरोनाच्या रुग्णाची प्रथमच नोंद झाली. ५६ वर्षांची महिला युरोपहून परतली होती. ऑकलंडमध्ये दोन आठवड्यांचे विलगीकरण पूर्ण केल्यानंतर दहा दिवसांनी तिला संसर्ग झाल्याचे निदान झाले. या केंद्रातून घरी आल्यानंतर दोन दिवसांनी तिच्यात सौम्य लक्षणे दिसू लागली होती.

हे केंद्र सोडण्यापूर्वी तिची दोन वेळा चाचणी झाली होती आणि त्यात संसर्ग नसल्याचा अहवाल आला होता. आता तिच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा ठावठिकाणा शोधला जात आहे.  आता तिचे घरीच विलगीकरण करण्यात आले आहे. पन्नास लाख लोकसंख्येच्या देशात एक हजार ९२७ रुग्ण, २५ बळी अशी कोरोनाची आकडेवारी आहे. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अनेक ठिकाणी भेट
विलगीकरण केंद्रातून बाहेर पडल्यानंतर या महिलेने उत्तरेकडील अनेक ठिकाणांना भेट दिली. यात सुपरमार्केट, हॉटेल, कलादालन यांचा समावेश असून ही यादी जाहीर करण्यात आली आहे. तेथे त्याच सुमारास गेलेल्यांनी खबरदारी म्हणून घरीच राहावे आणि अत्यंत दक्षतेचा उपाय म्हणून चाचणी करून घ्यावी असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona patient first reported New Zealand after more than two months

Tags
टॉपिकस
Topic Tags: