ऑस्ट्रेलियात कोरोनाचे रुग्ण वाढले; संख्या ८ हजारावर 

पीटीआय
Tuesday, 7 July 2020

व्हिक्टोरियाची राजधानी मेलबॉर्न येथे कोरोनाबाधितांची संख्या सर्वाधिक असल्याने लॉकडाउनची घोषणा केली आहे. व्हिक्टोरिया राज्यात बाधितांची संख्या १२७ ने वाढली असून ही आकडेवारी आतापर्यंतची सर्वाधिक आहे.

मेलबॉर्न - कोरोना संसर्गाने जगभरात धुमाकूळ घातला असून त्यापासून ऑस्ट्रेलिया देखील अपवाद राहिलेले नाही. देशातील बाधितांची संख्या ८ हजारावर पोचल्याने काही राज्यात लॉकडाउनची सक्ती करण्यात येणार आहे. सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या दोन राज्यात व्हिक्टोरिया आणि साऊथ वेल्स राज्याच्या सीमा सिल करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. शंभर वर्षात प्रथमच या राज्याच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

व्हिक्टोरियाची राजधानी मेलबॉर्न येथे कोरोनाबाधितांची संख्या सर्वाधिक असल्याने लॉकडाउनची घोषणा केली आहे. व्हिक्टोरिया राज्यात बाधितांची संख्या १२७ ने वाढली असून ही आकडेवारी आतापर्यंतची सर्वाधिक आहे. तसेच दोन जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण मृतांची संख्या २२ झाली तर देशाची १०६ वर पोचली आहे. लॉकडाउनच्या नव्या गाइडलाइननुसार लोकांना केवळ कार्यालयीन कामकाज, औषध, किराणा सामान, शाळा यासाठीच बाहेर पडता येणार आहे. ज्यांना घरातून काम करणे शक्य नाही, अशा मंडळीनाच घराबाहेर जाता येईल. आरोग्य मंत्री ग्रेग हंट म्हणाले की, स्थानिक पातळीवर कोरोनाला रोखण्यात यश आल्यानंतरच राज्याच्या सीमा खुल्या केल्या जातील. न्यू साऊथ वेल्सचे मुख्य ग्लाडाईज बेरेजिक्लियन आणि पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांच्यात चर्चा झाल्यानंतरच सीमा बंद करण्याचा निर्णय घेतला गेला. नव्या नियमानुसार साऊथ वेल्समध्ये येण्यासाठी व्हिक्टोरियाच्या नागरिकांना आता परवानगी घ्यावी लागणार आहे. नागरिकांना घराबाहेर पडण्यास मनाई केली असून त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी पोलिसांची गस्त वाढवण्यात येणार आहे. येत्या चोवीस तासात मेलबॉर्न शहरातील हॉटस्पॉट निश्‍चित करण्यात येणार असल्याने मेलबॉर्नच्या कोणत्याही नागरिकाला या काळात सीमापार जाता येणार नाही. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शंभर वर्षात प्रथमच सीमा सील  
व्हिक्टोरिया आणि न्यू साऊथ वेल्सच्या सीमा शंभर वर्षात प्रथमच सिल करण्यात आल्या आहेत. यापूर्वी १९१९ रोजी स्पॅनिश फ्लूचा फैलाव झाल्यानंतर सीमा बंद केल्या होत्या. मेलबॉर्न येथे सोशल डिस्टिन्सिंगचे कडक नियम लागू केले असून आणि ३० उपनगरासह नऊ हौसिंग टॉवरला देखील पूर्णपणे लॉकडाउन केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona patients increased in Australia

Tags
टॉपिकस
Topic Tags: