Coronavirs : ‘कोरोना’चा धोका ऑगस्टपर्यंत

वृत्तसंस्था
बुधवार, 18 मार्च 2020

ट्रम्प म्हणाले...

  • दहापेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येणे टाळावे
  • तरुण आणि निरोगी लोकांमध्ये थोडी तरी लक्षणे आढळली, तरी त्यांनी काळजी घ्यावी. त्यांच्यामुळे इतरांना लागण होऊन या विषाणूचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो, हे त्यांनी लक्षात घ्यावे
  • आपल्या ज्येष्ठ नागरिकांची काळजी मला जास्त वाटते

काही राज्यातील स्थिती
राज्य            रुग्ण    मृत्यू

न्यूयॉर्क           ९६७    १०
वॉशिग्टन         ९०४    ४८
कॅलिफोर्निया    ५५७    ७
मॅसाच्युसेट्स    १९७    ०
न्यूजर्सी            १७८    २

अमेरिकेतील एकूण बाधित - ४५५६
मृत्यू  - ८५

वॉशिंग्टन - अमेरिकेत कोरोना व्हायरसचा उद्रेक वाढत असतानाच ‘कोरोना’चा धोका ऑगस्टपर्यंत कायम राहण्याची शक्यता अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी व्यक्त केली.

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

‘आपण योग्य काळजी घेतली, तर देशातील मृतांची संख्या नक्कीच कमी होईल, असे मला वाटते. पण, लोक जुलै-ऑगस्टपर्यंतची चर्चा करीत आहेत. त्यांचे म्हणणे मला योग्य वाटते. कोरोना व्हायरसचे निर्मूलन होण्यासाठी एवढा काळ लागेल, असे मला वाटते,’’ असे ट्रम्प यांनी व्हाइट हाउसमधील पत्रकार परिषदेत सांगितले. या विषाणूचे संक्रमण आणि त्याचा प्रसार रोखण्यासाठी आपल्यापैकी प्रत्येकला अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडायची असून, कठोरपणे प्रयत्न करायचे आहेत, असेही ते म्हणाले.

वुहानमध्ये नोव्हेंबरमध्येच आढळला कोरोनाचा पहिला रुग्ण

दरम्यान, कोरोना व्हायरसशी लढा देण्यासाठी डेमोक्रॅटिक पक्षाच्या सिनेटरनी ७५० अब्ज डॉलरचा प्रस्ताव दाखल केला आहे. यात रुग्णालयाची क्षमता वाढविणे, बेरोजगार विमा आणि अमेरिकेचे नागरिक, उद्योग आणि आरोग्य क्षेत्रासाठी थेट मदतीची मागणीही त्यांनी केली आहे. कोरोना व्हायरसचा फटका अमेरिकेच्या विमान कंपन्यांनाही बसला असून, त्यांनी सरकारकडे ५० अब्ज डॉलरची मदत मागितली आहे. अमेरिकेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या वेळी विमान कंपन्यांना मिळालेल्या मदतीपेक्षा ही मागणी खूप जास्त आहे, असे सांगण्यात येते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona threat until August donald trump