लसीकरणाचा परिणाम; ब्रिटनमध्ये एकही मृत्यू नाही तर इस्त्राईलमध्ये ‘हर्ड इम्युनिटी’

लसीकरणाचा परिणाम; ब्रिटनमध्ये एकही मृत्यू नाही तर इस्त्राईलमध्ये ‘हर्ड इम्युनिटी’

लंडन : कोविड प्रतिबंधक लसीकरणाचे सकारात्मक परिणाम (Corona Vaccination Impact) जगभरात दिसून येत आहे. इस्त्राईलमध्ये ६० टक्क्यांपेक्षा अधिक लसीकरण झाल्याने सामूहिक प्रतिकारशक्ती (हर्ड इम्युनिटी) विकसित झाली (Britain and herd immunity in Israel) असताना ब्रिटनमध्ये मंगळवारी कोरोनामुळे एकाचाही मृत्यू झाला नाही. ही घटना गेल्यावर्षीच्या मार्च महिन्यानंतर प्रथमच घडली आहे. इस्त्राईलमध्ये सुमारे ८० टक्के ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. या बळावर इस्त्राईलने हर्ड इम्युनिटी मिळवली आहे. दुसरीकडे ब्रिटनमध्ये देखील लसीकरणाचे सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत. दहा महिन्यानंतर प्रथमच मंगळवारी कोरोनामुळे एकाचाही मृत्यू झाला नाही. इस्त्राईलमध्ये हॅर्ड इम्युनिटी तयार झाल्याने कोरोना संसर्गाचे सरासरी १५ टक्के रुग्ण आढळून येत आहेत. (Corona Vaccination Impact Positive effect of vaccination in Britain and herd immunity in Israel)

लसीकरणाचा परिणाम; ब्रिटनमध्ये एकही मृत्यू नाही तर इस्त्राईलमध्ये ‘हर्ड इम्युनिटी’
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून होणार कोरोनाचं निदान; ‘XraySetu’ॲप विकसित
vaccination
vaccinatione sakal

एक वर्षानंतर कोरोना संसर्गाचा हा नीचांक मानला जात आहे. यादरम्यान काल इस्त्राईल सरकारने कोविडला रोखण्यासाठी लागू केलेले सर्व निर्बंध मागे घेतले.आता यानुसार नागरिक रेस्टॉरंट, क्रीडांगण आणि चित्रपटगृहात, बाजारात निर्धास्तपणे जावू शकतात. यासाठी लस घेतल्याचा पुरावा दाखवण्याची गरज भासणार नाही. इस्त्राइलमध्ये नव्या नियमानुसार शाळा अगोदरच सुरू झाल्या आहेत. तसेच मास्क देखील वापरण्याची आवश्‍यकता नसल्याचे सरकारने म्हटले आहे. देशभरातील नागरिकांना आता फेरी काढता येणार आहे. इस्त्राइलमध्ये आता केवळ आता एकच निर्बंध लागू असून त्यानुसार सार्वजनिक घरात मास्क घालणे अनिवार्य आहे. अर्थात ही अट पुढील आठवड्यात मागे घेतली जाण्याची शक्यता आहे. ९० लाख लोकसंख्येच्या इस्त्राईलमध्ये १९ डिसेंबर रोजी लसीकरण मोहीम सुरू झाली. त्यानंतर महिनाभरातच संसर्गाच्या दरात घसरण सुरु झाली.

लसीकरणाचा परिणाम; ब्रिटनमध्ये एकही मृत्यू नाही तर इस्त्राईलमध्ये ‘हर्ड इम्युनिटी’
राज्यातील बारावीच्या परीक्षांबाबत आजही निर्णय नाही!
corona testing
corona testingcorona testing

चारच रुग्ण आढळले

हर्ड इम्युनिटीपर्यंत पोचण्यासाठी ७० ते ८० टक्के लोकांना लस मिळणे गरजेचे आहे. मात्र इस्त्राईलने केवल ६० टक्के लोकांना लस देऊन हर्ड इम्युनिटी मिळवली. आता त्यात ८० टक्के ज्येष्ठ नागरिक आहेत. लहान मुलांना अद्याप लस दिलेली नाही. कोरोना संसर्गाच्या नवीन संक्रमणाची संख्या आता नीचांकी पातळीवर पोचली आहे. काल केवळ चारच रुग्णांना लागण झाली आहे. गेल्यावर्षी मार्च महिन्यात कोरोना सुरू झाल्यानंतर सुरवातीच्या काळात कोरोनाचे प्रमाण कमी होते. आता संसर्ग कमी होत असल्याने निर्बंध कमी केले जात आहेत.

सध्याचा इस्त्राईलमधील स्ट्रेन पाहता तो इस्त्राइलमधील कोरोनाचा अंत म्हणावा लागेल. आम्ही नैसर्गिक रुपाने हर्ड इम्युनिटीपर्यंत पोचलो आहोत

- डॉ. इयाल जमलचमान, शेबा मेडिकल सेंटर

कोरोना रुग्णाच्या मृत्युला मंगळवारी ‘ब्रेक’

ब्रिटनमध्ये कोरोनामुळे होणाऱ्या मृत्युला मंगळवारी ‘ब्रेक’ लागला. ब्रिटनमध्ये चोवीस तासात कोरोनामुळे एकाचाही मृत्यु न होणे ही घटना दहा महिन्यात प्रथमच घडली आहे. दुसरीकडे ब्रिटनमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून येत असून त्याचदिवशी ३१६५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यादरम्यान ब्रिटनवर तिसऱ्या लाटेचे सावट निर्माण झशले आहे. कोरोना डेल्टा व्हेरियंट हा संपूर्ण ब्रिटनमध्ये पसरत आहे. हा स्ट्रेन भारतात आढळून आला होता. गेल्या महिन्यात शेवटच्या आठवड्यात कोरोनाच्या रुग्णात किरकोळ वाढ नोंदली गेली. या ठिकाणी मे महिन्याच्या प्रारंभी दररोज दोन ते अडीच हजार रुग्ण सापडत होते. आता हाच आकडा चार हजारावर गेला आहे. १ जून रोजी ३१६५ जणांना बाधा झाली आहे. ब्रिटनमध्ये आतापर्यंत ४४.९० लाख जणांना बाधा झाली तर ४२.९१ लाख लोक बरे झाले. यादरम्यान २७,७८२ जणांचा मृत्यू झाला. सध्या ७१,१६९ जणांवर उपचार सुरू आहेत.

‘अनलॉक’ टाळण्याचे आवाहन

तज्ञांनी ब्रिटन सरकारला तिसऱ्या लाटेचा इशारा दिला असून २१ जून रोजी संपूर्णपणे निर्बंध काढून घेण्याचा निर्णय तीन चार आठवडे लांबणीवर टाकावा, असे आवाहन करण्यात येत आहे. देशात लसीकरण मोहीम सुरू असतानाही नव्या व्हेरियंटमुळे रुग्णालयात जाणाऱ्यांची आणि मृतांची संख्या वाढू शकते, असे ब्रिटिश मेडिकल असोसिएशनने पंतप्रधानांच्या आकडेवारीचा संदर्भ घेत म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com