esakal | वाघ-अस्वलांना दिली कोरोना लस; वानरे आणि डुकरांनाही मिळणार
sakal

बोलून बातमी शोधा

वाघ-अस्वलांना दिली कोरोना लस; वानरे आणि डुकरांनाही मिळणार

वाघ-अस्वलांना दिली कोरोना लस; वानरे आणि डुकरांनाही मिळणार

sakal_logo
By
विनायक होगाडे

सॅनफ्रान्सिस्को : कोरोनाचा हाहाकार गेल्या काही दिवसांपासून जगभरात सुरु आहे. अजूनही या संकटातून आपली मुक्तता झालेली नाहीये. डोळ्यांनाही न दिसणाऱ्या या विषाणूने माणूस प्राण्याचं सगळं जनजीवनचं विस्कळीत करुन टाकलंय. या विषाणूचा प्रभाव नष्ट करण्यासाठी सध्या जगभरात लसीकरण मोहिम सुरु आहे. मात्र, फक्त माणूस प्राणीच या विषाणूच्या थैमान घालण्याने घायाळ झाला नाहीये तर अनेक प्राण्यांना देखील या विषाणूची बाधा झाल्याचं सिद्ध झालंय. कोरोनाच्या साथीत पशुपक्ष्‍यांचे संरक्षण करण्यासाठी राष्ट्रीय पातळीवरील मोहिमेअंतर्गत येथील अमेरिकेतील काही प्राणिसंग्रहालयात लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे.

हेही वाचा: जेफ बेझोस ‘ॲमेझॉन’मधून निवृत्त; जाणून घ्या त्यांच्याबद्दल सर्वकाही

‘सॅनफ्रान्सिस्कोच्या बे एरियामधील प्राणिसंग्रहालयातील वाघ, अस्वले आदी प्राण्यांना प्रायोगिक तत्त्वावरील लस देण्यात आली. ऑकलंड प्राणिसंग्रहालयातील ‘जिंजर व ‘मोली’ नावाच्या वाघांना प्रथमच लस देण्यात आली, अशी माहिती येथील एक वृत्तपत्राने दिली. न्यूजर्सीमधील झोयटी या पशुऔषध निर्माण कंपनीने लस विकसित केलेली लस उद्यानांना देणगीदाखल दिली आहे. या प्राणिसंग्रहालयातील एकाही प्राण्याला कोरोनाचा संसर्ग झालेला नाही. केवळ खबरदारीचा उपाय म्हणून त्यांचे लसीकरण सुरू केले आहे, असे येथील पशुसेवेचे उपाध्यक्ष अलेक्स हरमन यांनी सांगितले. सर्वांत आधी वाघ, अस्वले, सिंह आणि फेरेट यांना लशीचा पहिला किंवा दुसरा डोस देण्यात आला आहे. पुढे वानरे व डुकरांना लस दिली जाणार आहे.

loading image
go to top