esakal | जेफ बेझोस ‘ॲमेझॉन’मधून निवृत्त; जाणून घ्या त्यांच्याबद्दल सर्वकाही
sakal

बोलून बातमी शोधा

जेफ बेझोस ‘ॲमेझॉन’मधून निवृत्त; जाणून घ्या त्यांच्याबद्दल सर्वकाही

जेफ बेझोस ‘ॲमेझॉन’मधून निवृत्त; जाणून घ्या त्यांच्याबद्दल सर्वकाही

sakal_logo
By
विनायक होगाडे

वॉशिंग्टन : जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती जेफ बेझोस (वय ५७) हे ॲमेझॉन या बलाढ्य ऑनलाइन विक्री कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदावरुन सोमवारी पायउतार झाले. बेझोस यांनीच ही माहिती आज दिली. त्यांची जागा अँडी जेस्सी घेणार आहेत. ॲमेझॉन वेब सर्व्हिसेसचे ते २० वर्षांपासून ‘सीईओ’ होते. बेझोस यांच्यानंतर जेस्सी हे ॲमेझॉनचे दुसरेच मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. पुढील दहा वर्षे त्यांना २० कोटी डॉलर जादा वेतन देण्यात येणार असल्याचे कंपनीने सांगितले. बेझोस यांच्यासाठी आजचा दिवस विशेष आहे. कारण २७ वर्षांपूर्वी याच दिवशी म्हणजे ५ जुलै १९९४ रोजी त्यांनी ‘ॲमेझॉन’ची स्थापना केली होती. ‘सीईओ’पद सोडले असले तरी कार्यकारी अध्यक्ष म्हणून कंपनीशी त्यांचे नाते कायम राहणार आहे. आता ते नवी उत्पादने व नव्या उपक्रमांवर लक्ष केंद्रित करणार आहेत. ब्लू ओरिजिन ही रॉकेट कंपनी आणि ‘वॉशिंग्टन पोस्ट’ या वृत्तपत्राची जबाबदारी पेलण्यास ते सज्ज झाले आहेत.

हेही वाचा: कोरोनाचा गरीब महिलांना सर्वाधिक फटका; अभ्यासातील माहिती

अब्जाधीशाची आवड, छंद व समाजसेवा...


- जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती
- सलग चौथ्या वर्षी त्यांची मालमत्ता २० हजार १८० कोटी डॉलरची
- पर्यटनाची आवड असून वेगवेगळ्या फिरायला गेल्यावर तेथील छायाचित्रे व व्हिडिओ ते सोशल मीडियावर पोस्ट करीत असतात
- गेल्या वर्षी त्यांनी भारताला भेट दिली. त्यावेळी मुंबईतील एका किराणा दुकानदाराला त्यांनी स्वतःच्या हाताने पार्सल दिले होते
- नवी दिल्लीतील ‘राजघाट’ला भेट देऊन महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली होती
- संगीताची आवड असून अमेरिकेचे गायक लिझ्झो यांचे चाहते
- पाककलेची आवड. तयार केलेल्या पदार्थांची छायाचित्रे सोशल मीडियावर आवर्जून पोस्ट करतात
- जागतिक तापमान वाढीच्‍या प्रश्‍नावर काम करण्यासाठी ‘बेझोस अर्थ फंड’ची स्थापन
- पर्यावरण रक्षणासाठी काम करणारे शास्त्रज्ञ, कार्यकर्ते यांना २०२०मध्ये ७९ कोटी दहा लाख डॉलरची मदत
- ‘बेझोस ॲकॅडमी’तून अल्प उत्पन्न गटातील मुलांना मोफत शालेय शिक्षणाची सोय. बेघरांसाठी निवारागृहांची निर्मिती
- गेल्या वर्षी अमेरिकेत कोरोनाची साथ काळात गरजूंना अन्न पुरविणाऱ्या संघटनांना ‘फिडिंग अमेरिका’ उपक्रमाद्वारे दहा कोटी डॉलरची भेट

हेही वाचा: धक्कादायक! शाळेला दांडी मारण्यासाठी मुलेच तयार करताहेत कोरोनाचा फेक रिपोर्ट

निवृत्तीनंतर...


-विज्ञानप्रेमी बेझोस हे २० जुलै रोजी अवकाशात भरारी मारणार आहेत.
- अंतराळ पर्यटनाच्या विकासासाठी स्थापन केलेल्या ब्लू ओरिजिन’ या कंपनीच्या ‘न्यू शेपर्ड’ यानातून अवकाशात जाणारे ते पहिले पर्यटक ठरतील
- चित्रपट निर्मितीसाठी हॉलिवूड अभिनेता ड्वेन जॉन्सन याच्या ‘सेव्हन बक्स प्रॉडक्शन’बरोबर ‘ॲमेझॉन स्टुडिओ’ची भागीदारी.
- ‘वॉशिंग्टन पोस्ट’ या वृत्तपत्राच्या कामकाजात लक्ष घालणार. २०१३ मध्ये हे दैनिक बेझोस यांनी २५ कोटी डॉलरला विकत घेतले होते.
- सामाजित कामे पुढेही सुरू ठेवणार

loading image
go to top