कोरोना लशीच्या जोडीला राष्ट्रवाद

वृत्तसंस्था
Saturday, 29 August 2020

सध्या अपेक्षित असलेल्या डोसांचे प्रमाण पाहता इतर देशांना ते कमी पडेल. 30 ते 40 देशांकडे लस असेल, तर जवळपास दीडशे देशांसमोर पेच असेल. त्यामुळे मोठे संकट ओढवू शकते.

लंडन - जगात थैमान घालत असलेल्या कोरोना विषाणूवर परिणामकारक आणि सुरक्षित लस निघण्याआधीच ती मिळवण्यासाठी श्रीमंत देशांनी मोर्चेबांधणी केली आहे. गरीब आणि छोटे देश मात्र पिछाडीवर पडले आहेत.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

बिल आणि मेलिंडा गेट््स फाऊंडेशनच्या गावी या संस्थेचे मुख्य कार्यवाह डॉ. सेथ बर्कली यांनी सांगितले की, अमेरिका आणि युरोपीय महासंगातील सर्व देशांतील लोकसंख्येला लस द्यायची असेल तर एक अब्ज 70 कोटी डोस लागतील. सध्या अपेक्षित असलेल्या डोसांचे प्रमाण पाहता इतर देशांना ते कमी पडेल. 30 ते 40 देशांकडे लस असेल, तर जवळपास दीडशे देशांसमोर पेच असेल. त्यामुळे मोठे संकट ओढवू शकते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अमेरिका 
ऑक्सफर्ड-अॅस्ट्राझेनेका यांच्याशी करार
कराराची रक्कम 9 हजार कोटी रुपये
एझेडडी1222 लशीचे 30 कोटी डोस मिळविणार
शिवाय विविध औषध कंपन्यांशी करार, ज्याची रक्कम 6 अब्ज डॉलर (45 हजार कोटी रुपये)
जानेवारी 2021 पर्यंत तमाम जनतेला लस देण्याचे लक्ष्य

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

ब्रिटन 

 • ऑक्सफर्ड विद्यापीठ लस बनवीत असूनही इतर देशांशी करार
 • मागील आठवड्यात अमेरिकी कंपनी बायोटेकशी यशस्वी वाटाघाटी
 • बेल्जियमच्या जेन्सन कंपनीशीही करार
 • या दोन करारांतून 9 कोटी डोस मिळविणार
 • लोकसंख्या 6.6 कोटी असलेला ब्रिटन 34 कोटी डोस मिळविणार

जपान

 • अमेरिकी कंपनी फायजर आणि जर्मन कंपनी बायोएनटेक यांच्याशी करार
 • सुमारे 6 कोटी लोकसंख्येचा जपान 12 कोटी डोस मिळविणार
 • जून 2021 पर्यंत डोस  मिळण्याची अपेक्षा

भारत

 • स्पुटनिक व्ही लशीसाठी रशियाशी चर्चा
 • ऑक्सफर्डच्या लशीची चाचणी
 • पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटमध्ये उत्पादन
 • मार्च 2021 पर्यंत 30 ते 40 कोटी डोस तयार होण्याची अपेक्षा

युरोपीय महासंघ 

 • 60 कोटी डोस मिळवण्यासाठी करार
 • 30 कोटी ऑक्सफर्ड विद्यापीठ, तर 30 कोटी फ्रेंच कंपनी सॅनोफीकडून मिळविणार
   

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona vaccine japan india britan