WHO चे अध्यक्ष
WHO चे अध्यक्ष Sakal

कोरोना साथीचा अंत २०२२ मध्येच : WHO चे अध्यक्ष

कोरोना विषाणूच्या साथीतून २०२२मध्ये जग मुक्त होऊ शकते, अशी आशा दाखवत जर आपण एकत्रितपणे लशीतील विषमता दूर करू शकलो तर हे शक्य होईल

न्यूयॉर्क : कोरोना विषाणूच्या साथीतून २०२२मध्ये जग मुक्त होऊ शकते, अशी आशा दाखवत जर आपण एकत्रितपणे लशीतील विषमता दूर करू शकलो तर हे शक्य होईल, असे प्रतिपादन जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) अध्यक्ष टेड्रोस अधनोम घेब्रेयेसूस यांनी नववर्षाचा संदेश देताना केले.

ते म्हणाले, ‘‘संपूर्ण जगाला कोरोना विळखा पडला असून साथीचे हे सलग तिसरे वर्ष आहे. या संकटातून एकाही देशाची सुटका झालेली नसली तरी बचाव व उपचारासाठी आपल्याकडे अनेक पर्याय आहेत. लशींतील असमानता प्रदीर्घ काळ कायम राहिल्यास या विषाणूच्या फैलावाचा धोका एवढा मोठा आहे की, आपण तो थोपवू शकत नाही किंवा त्याला अटकावही घालता येणार नाही.’’ यासाठी विकसित देशांनी त्यांच्याकडील लशींचा साठ दुसऱ्या देशांना दिला पाहिजे, अशी अपेक्षा घेब्रेयेसूस यांनी व्यक्त केली.

WHO चे अध्यक्ष
पुणे : महापालिका सोमवारपासून सुरु करणार गुंठेवारीची नोंदणी

‘‘लशींच्या असमानतेमुळेच ओमिक्रॉनसारखे प्रकार निर्माण होण्यास पोषक परिस्थिती निर्माण झाली. कोरोनामुळे निर्माण होणाऱ्या आरोग्यासंबंधीच्या समस्यां जगभरातील नागरिकांना पुढील वर्षी भेडसावतील. नियमित लसीकरणाला लाखो लोक मुकतील, कुटुंब नियोजन, संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य रोगांवरील उपचार त्यांना उपलब्ध होऊ शकणार नाहीत,’’ अशी शक्यताही त्यांनी वर्तविली.

‘डब्लूएचओ’चे जैविक केंद्र

भविष्यात येणाऱ्या साथी व जागतिक साथींचा मुकाबला करण्यासाठी जगाने तयार राहावे, यासाठी आम्ही ‘डब्लूएचओ’चे जैविक केंद्र स्थापन केले आहे. याद्वारे नवनवीन जैविक साहित्याची देवाणघेवाण करणे देशांना शक्य होणार आहे, अशी माहिती देत घेब्रेयेसूस म्हणाले की, प्रत्येक देशाने लसीकरणावर भर द्यावा. २०२२च्या मध्यापर्यंत सर्व देशांतील लोकसंख्येच्या ७० टक्के नागरिकांच्या लसीकरणाचे जागतिक उद्‍दिष्ट पूर्ण करण्यासाठी सर्व देशांनी एकत्र काम करण्याची गरज आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com