
पुणे : महापालिका सोमवारपासून सुरु करणार गुंठेवारीची नोंदणी
पुणे : राज्यशासनाने गुंठेवारीतील बांधकामे नियमित करण्याचा आदेश ऑक्टोबर महिन्यात दिला होता. पण त्याची अंमलबजावणी महापालिकेने सुरू केली नव्हती. अखेर ही प्रक्रिया सोमवारपासून (ता. १०) सुरू होणार आहे. ही नोंदणी ऑनलाइन होणार असून, यासाठी नागरिकांनी आर्किटेक्टची मदत घेऊन त्यांचा प्रस्ताव सादर करावा असे आवाहन महापालिकेने केले आहे. पुढील तीन महिने अर्ज करण्यासाठी मुदत आहे.
पुणे महापालिकेत आज (ता. ३) गुंठेवारीतील बांधकामे नियमीत करण्यासाठी प्रशासन व पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यानंतर महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ही माहिती दिली. महापौर म्हणाले, शासनाच्या आदेशानुसार, बांधकामे नियमित करण्यासाठी पद्धती निश्चित करण्यात आली आहे. महापालिकेत समाविष्ट झालेल्या नव्या गावांसह जुन्या हद्दीतील सर्व अर्ज ऑनलाइन स्वीकारले जाणार आहेत.
हेही वाचा: नागपूरात चिमुकल्यासह चौघांना ओमिक्रॉन; १३३ जण कोरोनाच्या विळख्यात
न्यायालयाच्या आदेशानुसार विमानतळाच्या सीमाभिंत पासून १०० मिटर व बॉम्ब डंपचे सीमा भिंती पासून ९०० मिटर क्षेत्रात झालेली बांधकामे आणि विमानतळाच्या फनेल झोन मध्ये असलेली बांधकामे यांना संरक्षण खात्याचे ना हरकत प्रमाणपत्र असेल तर ही बांधकामे नियमित होतील. पुढील तीन महिने अर्ज स्वीकारले जातील. त्यानंतर एकत्रित सर्व अर्जांची छाननी केली जाणार आहे. यासाठी प्रतिगुंठा सुमारे १५०० रुपये शुल्क निश्चीत केले आहे.
एजंटांच्या नादाला लागू नका
गुंठेवारीचे प्रस्ताव सादर करताना कोणत्याही एजंटाच्या नादाला लागू नका, आर्किटेक्टच्या मदतीने ऑनलाइन अर्ज करावेत, हे अर्ज स्वीकारले जातील. आर्किटेक्टने एका अर्जासाठी ५ हजार रुपयांपेक्षा जास्त शुल्क घेऊ नयेत, अशी सूचना दिल्या आहेत, असे मोहोळ यांनी सांगितले.
हेही वाचा: सीमाप्रश्नी तातडीने उच्चाधिकार समितीची बैठक बोलवावी; एकीकरण समिती
या बांधकामांना दिलासा नाही
- रेड झोन, बीडीपी, हिल टॉप हिल स्लोप, ग्रीन झोन, शेती झोन
- ना विकास झोन, आरक्षण, विकास आराखड्यातील रस्त्यावरील बांधकामे, नदीपात्र.
- शासकीय जागेवर झालेली बांधकामे तसेच अशंत: झालेली बांधकामे.
Web Title: Pune Corporation Property Registration
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..