संसर्गाची तिसरी लाट ओमिक्रॉनमुळेच; तज्ज्ञांचा अंदाज

कोरोना संसर्गाची तिसरी लाट पसरू लागली असून याला ओमिक्रॉन या व्हेरिएंटचाच प्रसार कारणीभूत असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.
omicron
omicronsakal

नवी दिल्ली : देशातील विविध राज्यांमध्ये कोरोना संसर्गाची तिसरी लाट पसरू लागली असून याला ओमिक्रॉन या व्हेरिएंटचाच प्रसार कारणीभूत असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

सध्या सर्वच भागांमध्ये ओमिक्रॉन बाधितांची संख्या वाढत असल्याचे दिसून आले आहे. देशभर कोरोना संसर्गाची तिसरी लाट येण्यासाठी ओमिक्रॉन हा व्हेरिएंटच कारणीभूत असल्याचे उघड झाले आहे, असेही तज्ज्ञांनी म्हटले आहे.

दरम्यान आग्नेय आशियायी देशांमधील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी कठोर निर्बंध आणि आरोग्यविषयक उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे मत जागतिक आरोग्य संघटनेने मांडले आहे. ओमिक्रॉन व्हेरिएंटची लक्षणे तुलनेने सौम्य असली तरीसुद्धा त्याच्याकडे दुर्लक्ष करता कामा नये असे मत आरोग्य संघटनेच्या आग्नेय आशियायी विभागाच्या प्रादेशिक संचालक डॉ. पूनम क्षेत्रपालसिंह यांनी मांडले. मास्क घालणे, हातांची स्वच्छता आणि सुरक्षित अंतर ठेवणे याबाबी महत्त्वाच्या असल्याचे त्या म्हणाल्या.

फेब्रुवारीत गाठणार उच्चांक

देशातील कोरोना प्रसाराचे प्रमाण दर्शविणारा ‘आर-नॉट व्हॅल्यू’ या आठवड्यामध्ये चार टक्क्यांवर पोचले असून यावरून हा संसर्ग खूप वेगाने पसरत असल्याचे दिसून येते असे संशोधकांनी म्हटले आहे. कोरोनाच्या संसर्गाची तिसरी लाट ही १ ते १५ फेब्रुवारी दरम्यान उच्चांकी पातळीवर पोचण्याची शक्यता आयआयटी मद्रासने व्यक्त केली आहे.

३१ लाख लोक मरण पावल्याचा अंदाज

‘सायन्स जर्नल’ या विज्ञानविषयक नियतकालिकामध्ये प्रसिद्ध झालेल्या ताज्या संशोधनामुळे खळबळ निर्माण झाली आहे. एका अभ्यासानुसार भारतात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या लोकांची वास्तविक संख्या ही नोंदविलेल्या आकड्यांच्या सहापट असू शकते. भारतात आतापर्यंत ४ लाख ८३ हजार १७८ मृत्यूची अधिकृत नोंद करण्यात आली आहे. पण ‘सायन्स जर्नल’च्या अभ्यासानुसार देशभरात अंदाजे किमान ३१ लाख लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असावा. गेल्या वर्षी एप्रिल ते जूनदरम्यान कोरोनामुळे अंदाजे ७१ टक्के म्हणजेच तब्बल २७ लाख मृत्यू झाल्याचा अंदाज आहे.

दिवसभरात

चेन्नईत ५० डॉक्टरांना कोरोनाचा संसर्ग

झारखंडचे आरोग्यमंत्रीही कोरोना पॉझिटिव्ह

उत्तराखंडमध्ये १६ जानेवारीपर्यंत सभांना ब्रेक

प. बंगाल सरकारकडून निर्बंध आणखी शिथिल

मुंबई सीबीआयचे ६८ कर्मचारी कोरोनाबाधित

हिमाचलमध्ये उपचारासाठी कोरोना चाचणी अनिवार्य

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com