Covid -19 : कोरानाला हलक्यात घेणं पडू शकतं भारी; WHO ने दिला इशारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Covid -19 and WHO

जागतिक पातळीवर कोराना पॉझिटीव्ह येणाऱ्यांची संख्या आणि होणारे मृत्यु यांचा आकडा घटला आहे.

Covid -19 : कोरानाला हलक्यात घेणं पडू शकतं भारी; WHO ने दिला इशारा

जागतिक पातळीवर कोविड-19 मुळे दर 44 सेकंदाला एका व्यक्तीचा मृत्यु होत असून पुन्हा एकदा कोरोनाकडे दुर्लक्ष करणं हानिकारक ठरू शकतं, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organization ) दिला आहे.

जागतीक पातळीवर कोराना पॉझिटीव्ह येणाऱ्यांची संख्या आणि होणारे मृत्यु यांचा आकडा घटला आहे. ही बाब सकारात्मक असली तरी हे चित्र अबाधित राहील याची खात्री नाही. हा रोग कधीच संपणार नाही.असे, डब्ल्यूएचओचे महासंचालक टेड्रोस अधानोम घेब्रेयसस म्हणाले. डब्ल्यूएचओच्या आयोजित सभेत ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, फेब्रुवारी 2022 नंतर आलेल्या रिपोर्ट्सनुसार कोविडमुळे झालेल्या मृत्युदरात 80 टक्के घट होऊ शकते. पण, गेल्या आठवड्यातील रिपोर्ट्सनुसार, प्रत्येक 44 सेकंदाला एका व्यक्तीचा मृत्यु झाला आहे. यातील अनेक मृत्यु टाळता येऊ शकतात. काळजी घ्या, कोरोना अद्याप गेला नाही, हे माझे बोलणे ऐकूण तूम्ही कंटाळले असाल. पण, जोवर हा रोग जगातून हद्दपार होत नाही तोवर मी हे सांगत राहीन, असेही घेब्रेयसस म्हणाले.

WHO पुढील आठवड्यात सहा धोरणांचा एक संच प्रकाशित करेल. ज्यात कोरोनापासून बचाव करण्यासाठी सरकारसाठी नविन धोरणे असतील. ही धोरणे सरकारने राबवल्यास कोरानापासून बचाव करण्यात आपण यशस्वी होऊ, अशी माहितीही त्यांनी दिली.

मंकीपॉक्सवर या रोगावरही त्यांनी मत व्यक्त केले. युरोपमध्ये मंकीपॉक्सच्या रूग्णांमध्ये घट झाली आहे. मागील आठवड्यात अमेरिकेतील रुग्णांमध्येही घट झाली असली तरी त्या प्रदेशातील साथीच्या रोगाबद्दल ठोस निष्कर्ष काढणे कठीण आहे. WHO च्या म्हणण्यानुसार, एकूण 52,997 लोकांना मंकीपॉक्स व्हायरसची लागण झाली आहे. गेल्या महिन्याभरात नोंदवलेल्या केसेसपैकी 70.7 टक्के यूएस आणि 28.3 टक्के युरोपमधून पॉझिटीव्ह आले आहेत.

Web Title: Corona Virus Kills One Person Every 44 Seconds Globally Says Who

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..