कोरोनाची लक्षणं नसलेल्या रुग्णांबाबत शास्त्रज्ञांचा मोठा खुलासा

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 27 October 2020

जगभरात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे.

लंडन- जगभरात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. अशात ब्रिटनच्या एका संशोधनानुसार, ज्या लोकांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून आली आहेत, त्यांच्या तुलनेत ज्यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणे दिसली नव्हती अशा रुग्णांमधील अँटीबॉ़डी लवकर नष्ट होऊन जातात. इंपीरियल कॉलेज लंडन आणि इप्सोस मोरी  (Imperial College London and market research firm Ipsos Mori) यांनी हे संशोधन केले आहे. यात असंही सांगण्यात आलंय की, 75 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या लोकांमध्ये 18-24 वर्ष वयाच्या मुलांच्या तुलनेत अँटीबॉडी लवकर नष्ट होतात. 

जून आणि सप्टेंबरदरम्यान कोरोनाची बाधा झालेल्या हजारो इंग्लडच्या नागरिकांचे सॅम्पल घेण्यात आले होते. यावेळी त्यातील एक चतुर्थांश लोकांमधील अँटिबॉडी नष्ट झाल्याचे संशोधनात सांगण्यात आले आहे. आरोग्य मंत्री जेम्स बेथेल यांनी यावर बोलताना म्हटलं की, हे एक महत्वपूर्ण संशोधन आहे. याच्याद्वारे अँटिबॉडीचे समीकरण समजण्यास मदत होईल. संशोधनासाठी 365,000 लोकांना निवडण्यात आले होते. यामध्ये वयस्कर लोकांचाही समावेश होता. संशोधनात असं समोर आलंय की, जितक्या लोकांचे सॅम्पल घेण्यात आले होते, त्यातील 26.5 टक्के लोकांमध्ये तीन महिन्याच्या कालावधीत अँटिबॉ़डी नष्य झाल्या आहेत. 

चांगली बातमी! रशियाच्या 'स्पुटनिक-5' कोरोना लशीबाबत मोठा दावा

जगभरात कोरोना महामारीचे थैमान सुरुच आहे. कोरोनावर प्रभावी ठरणारी लस शोधून काढण्यासाठी जगभरातील वैज्ञानिक प्रयत्न करत आहे. 2021 च्या सुरुवातीपर्यंत कोविड लस उपलब्ध होण्याची शक्यता आहे. वैज्ञानिकांनी कोरोना विषाणूबाबतचा अभ्यास सुरु ठेवला आहे. यातून अनेक गोष्टी समोर येत आहे. मागे करण्यात आलेल्या एका संशोधनात एकदा कोरोनाची लागण झाल्यास, पुन्हा विषाणूची बाधा होऊ शकते, असं सांगण्यात आले होते. शिवाय एकदा कोरोना होऊ गेल्यानंतर शरीरात सर्वसाधारण 3 महिन्यापर्यत अँटिबॉटी राहतात असं वैज्ञानिकांनी म्हटलं आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona virus scientist big comment on asymptomatic patients