esakal | कोरोनाग्रस्तांच्या यादीत भारत आता पाचव्या स्थानावर
sakal

बोलून बातमी शोधा

Coronavirus cases: India overtakes Spain 5th highest in world

स्पेनला मागे टाकत भारत आता सर्वाधिक कोरोनाग्रस्तांच्या यादीत पाचव्या स्थानावर पोहोचला आहे.

कोरोनाग्रस्तांच्या यादीत भारत आता पाचव्या स्थानावर

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : स्पेनला मागे टाकत भारत आता सर्वाधिक कोरोनाग्रस्तांच्या यादीत पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. अमेरिकेच्या जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठच्या सांगण्यानुसार भारतात कोरोना रुग्णांची संख्या २ लाख ४५ हजार ६७० वर गेली आहे. गेल्या २४ तासांमधील कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता भारताने इटली आणि स्पेन या दोन देशांना कोरोना संक्रमणात मागे टाकले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

भारतासाठी ही गोष्ट अत्यंत चिंताजनक आहे. अमेरिका, ब्राझील, रूस, आणि ब्रिटेनमध्येदेखील कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. विजॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या आकड्यानुसार स्पेनमध्ये आतापर्यंत २ लाख ४१ हजार ३१० जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार भारतात काल (ता. ०६) सकाळी आठ वाजेपर्यंत गेल्या २४ तासांमध्ये ९ हजार ८८७ कोरोना रुग्ण आढळले तर २९४ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. भारतात आतापर्यंत ६ हजार ६४२ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. 

-----------
जी सेव्हनवरून चीनचा भारताला इशारा; अमेरिकेचा हा डाव असल्याचे मत
-----------
पुजारी करतायेत सॅनिटायझर वापरायला विरोध; कारण, वाचून व्हाल चकित
------------

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या महितीनुसार देशात १ लाख ९४२ कोरोना  रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर दिलासादायक बाब म्हणजे १ लाख १४ हजार ७२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. गेल्या २४ तासात ४ हजार ६११ रुग्ण कोरोनाच्या विळख्यातून बाहेर पडले आहेत. दरम्यान, जगात कोरोना व्हायरसचा विळखा दिवसागणिक आणखी घट्ट होताना दिसत आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार जगात आतापर्यंत ६९ लाख ७३ हजार २४७ जणांना कोरोना व्हायरसने ग्रासले आहे. २१३ देशात करोना व्हायरस या महामारीने चार लाख दोन हजार ६९ जणांचे बळी घेतले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत ३४ लाख ११ हजार ९८ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

loading image