चीनची राजधानी बीजिंगचं चित्र बदलतंय; सोशल डिस्टंसिंग, माक्सची सक्ती

coronavirus china beijing lockdown over
coronavirus china beijing lockdown over

बीजिंग Coronavirus : चीनमध्ये कोरोनाचा सर्वाधिक फटका, हुबेई प्रांत आणि वुहान शहराला बसला. पण, राजधानी बीजिंग आणि आर्थिक राजधानी शांघायलाही कोरोनाची झळ बसली आहे. कोरोनामुळं या दोन मोठ्या शहरांमधील जनजीवनही विस्कळीत झालं होतं. आता राजधानी बीजिंग पूर्वपदावर येत आहे.

कोरोनाच्या जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

कोरोना संसर्गामुळे गेले काही महिने बंद असलेल्या बीजिंग शहरातील जनजीवन आजपासून पुन्हा सुरु झाले. कोरोनावर विजय मिळविल्याचा दावा करत चीन सरकारने येथील वाहतुकीवरील आणि व्यवसायांवरील निर्बंध बऱ्याच प्रमाणात उठवले आहेत. बीजिंगमधील उद्याने, संग्रहालये आणि इतर पर्यटन स्थळे नागरिकांसाठी खुली करण्यात आली आहेत. अर्थात, सामाजिक अंतर आणि मास्क लावण्याचा नियम कायम ठेवला असून, कोणत्याही स्थळावर एकूण क्षमतेच्या ३० टक्के प्रेक्षकांनाच प्रवेशाची परवानगी देण्यात आली आहे. तसेच, कोठेही रांगा लावण्यास मनाई असून केवळ ऑनलाइन तिकीट काढण्याची सोय उपलब्ध करून दिलेली आहे. बीजिंगमध्ये गेल्या १४ दिवसांत एकही नवा रुग्ण न आढळल्याचा दावा सरकारने केला आहे. 

कोरोनाच्या जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

बीजिंगमध्ये महत्वाची बैठक 
चीनमधील सर्वोच्च राजकीय सल्लागार समिती असलेल्या 'सीपीपीसीसी'च्या राष्ट्रीय समितीची तिसरे वार्षिक सत्र २१ मे ला सुरू होत आहे. समितीचे अध्यक्ष वांग यांग यांच्या नेतृत्वाखाली नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बीजिंगमध्ये दोन दिवस चालणाऱ्या या बैठकीत सुमारे ३००० सदस्य सहभागी होणार आहेत. या शहरातील जनजीवन सुरू झाले असले तरी हे सर्व सदस्य प्रत्यक्ष सहभागी होणार की व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हजेरी लावणार, ते स्पष्ट झालेले नाही. या बैठकीत कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाच्या आगामी वार्षिक बैठकीतील मसुद्याबाबतही चर्चा झाली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तिसरे सत्र होणार असून यात आगामी काळात आवश्यक असलेल्या उपाययोजनांवर चर्चा होणे अपेक्षित आहे. तसेच, गरीबी निर्मुलन आणि आधुनिक समाजाची निर्मिती हे ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन करून त्यादृष्टीने पाऊले उचलली जाऊ शकतात. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com