अगोदर नाही म्हणाले आता पस्तावले! चिनी नागरिकांना हवीत भारतीय औषधं : Coronavirus | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

china arrested suspended coronavirus sending camps

Coronavirus: अगोदर नाही म्हणाले आता पस्तावले! चिनी नागरिकांना हवीत भारतीय औषधं

नवी दिल्ली : चीनमध्ये कोरोनानं मोठं थैमान घातलं आहे. त्यात त्यांच्या देशानं कोविडसाठी मंजूर केलेल्या अँटीव्हायरल औषधांचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. पण दुसरीकडं भारतीय फार्मा कंपन्यांच्या अँटीव्हायरल औषधांवर चीनी नागरिकांनी विश्वास दाखवला असून ही औषध चीनमध्ये चक्क काळ्या बाजारातून चढ्या किंमतींना विकली जात आहेत. (Coronavirus Chinese citizens desperate Searching for Indian Medicines Huge demand black market)

चीनमध्ये कोरोनाच्या संसर्गात वाढ होत असताना, फायझरच्या पॅक्सलोविडसारख्या (Paxlovid) अँटीव्हायरल औषधांचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळं लोकांना काळ्या बाजारातून बेकायदा पद्धतीनं औषध विकत घेण्यास प्रवृत्त केलं आहे. Paxlovid व्यतिरिक्त Azvudine या चीनी फर्मा कंपनी जेन्युइन बायोटेकनं बनवलेल्या HIV वरील औषधाला यावर्षी चीननं कोविडसाठी अँटीव्हायरल औषध म्हणून मंजूरी दिली. तथापि, हाँगकाँगस्थित साउथ चायना मॉर्निंग पोस्ट या वृत्तपत्रानुसार, या औषधांचा मर्यादित पुरवठा असल्यानं ही औषधं केवळ काही विशिष्ट रुग्णालयांमध्येच उपलब्ध आहेत.

चिनी लोक अँटीव्हायरल औषधांसाठी काळ्या बाजाराकडं घेताहेत धाव

चीनमध्ये सध्या कोविडच्या उद्रेकामुळं आरोग्य सेवा प्रणालीवर मोठा ताण आला आहे आणि व्हिटॅमिन सी युक्त अन्नपदार्थांची मागणी वाढली आहे. वेदनाशमक आणि तापाच्या औषधांच्या कमतरतेमुळं फार्मसी आणि ऑनलाइन साइट्सवर खरेदीसाठी भीतीचं वातारण निर्माण झालं आहे. डिसेंबरच्या सुरुवातीला, चीननं पॅक्सलोव्हिडच्या किरकोळ विक्रीला परवानगी दिली होती. तसेच ऑनलाइन आरोग्य सेवा देणाऱ्यांनाही औषधं लिहून देण्यासाठी अधिकृत मान्यता दिला होतं.

Pfizerनं विकसित केलेलं तोंडाद्वारे देण्यात येणारं अँटीव्हायरल औषध Paxlovid मुळं हॉस्पिटलायझेशन आणि मृत्यूचा धोका 89 टक्क्यांनी कमी होतो. यापार्श्वभूमीवर ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, लोक अँटीव्हायरल थेरपी शोधत आहेत. पण अशा औषधांचा पुरवठा कमी आहे. यामुळं चीनच्या बाहेर बनवलेल्या या औषधांच्या जेनेरिक औषध मिळवण्यासाठी लोकांना ऑनलाइन विक्री माध्यमांकडं वळण्यास प्रवृत्त केलं आहे. पण ही औषध ऑनलाईन विक्रीसाठी मान्यता नाही, असं वृत्त माध्यमांनी दिलं आहे. यापार्श्वभूमीवर बेकायदेशीर आयात केलेली भारतातील जेनेरिक औषधे कुठे मिळतील याबद्दल लोक सोशल मीडियावर माहिती आणि टिप्स शेअर करत आहेत.

कोणत्या भारतीय औषधांचा चिनी लोक घेताहेत शोध

साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या अहवालानुसार, कोविडप्रतिबंधक भारतीय जेनेरिक औषधे 1,000 युआन (US$144) प्रति बॉक्समध्ये विकली जात आहेत. हा विषय ट्विटर सारखा चिनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Weiboवर ट्रेंड करत आहेत. भारतातील चार जेनेरिक अँटीकोविड औषधं Primovir, Paxista, Molnunat आणि Molnatris या ब्रँड नावानं चीनमधील काळ्या बाजारात उपलब्ध आहेत, असंही या वृत्तात म्हटलं आहे. Tencent News च्या वृत्तानुसार, Paxlovidची विक्री 2,980 युआन प्रति बॉक्समध्ये केली जात आहे. तर भारतातील औषधांचा एक बॉक्स 530 ते 1,600 युआनमध्ये खरेदी केला जात आहे. विशेष म्हणजे, ही भारतीय औषधांना चीनमध्ये मान्यता नाहीत आणि त्यांची विक्री केल्यास शिक्षा होऊ शकते. हाँगकाँगस्थित वृत्तपत्रानुसार, काही ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म या जेनेरिक औषधांची विक्री करण्यासाठी कीवर्ड सेन्सॉरशिपला बायपास करण्यासाठी युफेमिस्टिक लेबल्सचा वापर करत आहेत.

डिसेंबरच्या सुरुवातीस चीननं आपल्या कठोर शून्य-कोविड धोरण मागे घेतलं. पण अचानक घेतलेल्या या निर्णयामुळं कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. झेजियांग-शांघाय जवळील औद्योगिक प्रांतांत दररोज दहा लाख नवीन रुग्णांची नोंद होत आहे, अशी माहिती रॉयटर्सनं दिली आहे.