पाकमध्ये ऐन संकटावेळी डॉक्टरांनी टाकला बहिष्कार

वृत्तसंस्था
Tuesday, 7 April 2020

जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला असताना डॉक्टर जीवाचे रान करून रुग्णांना वाचविण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, पाकिस्तानमधील डॉक्टरांनी कामावर बहिष्कार टाकत सेवाच बंद केली आहे.

इस्लामाबाद : जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला असताना डॉक्टर जीवाचे रान करून रुग्णांना वाचविण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, पाकिस्तानमधील डॉक्टरांनी कामावर बहिष्कार टाकत सेवाच बंद केली आहे.

पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट आहे. यामुळे देशाला लॉकडाऊन करणे शक्य नसल्याचा निर्णय पंतप्रधान इम्रान खान यांनी घेतला आहे. पण, कोरोना व्हायरसच्या संसर्गाविरोधात लढणाऱ्या डॉक्टरांनी कोरोनापासून बचाव करण्यासाठी सेफ्टी किट देणयाची मागणी केली होती. किट मिळत नसल्यामुळे युवा डॉक्टर आणि पॅरा मेडिकल कर्मचाऱ्यांनी क्वेटामध्ये आंदोलन केले. मात्र, या आंदोलनावर पोलिसांनी लाठीचार्ज केला. या लाठीचार्जच्या निषेधार्थ 'यंग डॉक्टर्स असोसिएशन'ने रुग्णालयातील सेवेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आणि सेवाच बंद केली

पाकमध्ये तबलिगींमुळे उडालाय हाहाकार...

दरम्यान, पाकिस्तानमध्ये कोरोना व्हायरसमुळे 45 जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या महिन्यात लाहोरमध्ये झालेल्या इस्लामिक बैठकीत सहभागी होण्यासाठी तबलिगी आले होते. यावेळी सभेला एक लाखांहून अधिक जण उपस्थित होते. कार्यक्रम झाल्यापासून पाकिस्तान आणि इतर देशांमध्ये कोरोना (कोविड-19) पसरण्याची शक्यता वाढली आहे. पाकिस्तानमध्ये तबलिगींमुळे हाहाकार उडाला असून, तब्बल 20 हजार तबलिगींना क्वारंटाइन करण्यात आले आहे.

तुमच्या मोबाईलवर ही छायाचित्रे आलेत ना? मग वाचाच...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus crisis pakistan doctors boycotted work