पाकिस्तानमध्ये तबलिगींमुळे उडालाय हाहाकार...

वृत्तसंस्था
Monday, 6 April 2020

पाकिस्तानमध्ये तबलिगींमुळे हाहाकार उडाला असून, तब्बल 20 हजार तबलिगींना क्वारंटाइन करण्यात आले आहे. पाकिस्तानमध्ये कोरोना व्हायरसमुळे 45 जणांचा मृत्यू झाला आहे.

इस्लामाबाद: पाकिस्तानमध्ये तबलिगींमुळे हाहाकार उडाला असून, तब्बल 20 हजार तबलिगींना क्वारंटाइन करण्यात आले आहे. पाकिस्तानमध्ये कोरोना व्हायरसमुळे 45 जणांचा मृत्यू झाला आहे.

Video: अन् त्याच्या चेहऱयालाच लागली आग

पाकिस्तानमध्ये तबलिगींमुळे परिस्थिती बिकट झाली आहे. गेल्या महिन्यात लाहोरमध्ये झालेल्या इस्लामिक बैठकीत सहभागी होण्यासाठी तबलिगी आले होते. त्यामुळे इतक्या मोठ्या संख्येने जमाती लोक धार्मिक मेळाव्यात गेले तर परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते. त्यामुळे त्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. तबलिगी जमात आयोजित कार्यक्रमात सहभागी झालेल्यांची चौकशी किंवा अलग ठेवण्याचे आदेश अधिकाऱ्यांनी दिले आहेत. हा कार्यक्रम लाहोरमध्ये 10-12 मार्च दरम्यान झाला होता. यावेळी सभेला एक लाखांहून अधिक जण उपस्थित होते. कार्यक्रम झाल्यापासून पाकिस्तान आणि इतर देशांमध्ये कोरोना (कोविड-19) पसरण्याची शक्यता वाढली आहे.

Video: कोरोनाला पळवून लावण्यासाठी भाजप नेत्याचा हवेत गोळीबार...

पाकचे प्रवक्ते अजमल वजीर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले की, 'आरोग्य अधिकारी सभेत सामील झालेल्या नागरिकांचा शोध घेत आहेत. काही जणांची तपासणी करण्यात आली असून, अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. लाहोर शहरात 7 हजार लोकांना क्वारंटाइन करण्यात आले आहे.'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pakistan troubled by tablegi jamat 20 thousand people quaranatine