
दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ देश लॉकडाउन आहे. वेगवेगळ्या भागात शिथिलता देत लॉकडाउन हटवण्याच्या दिशेने हालचाली सुरु आहेत.
जिनेव्हा : कोरोना विषाणूमुळे देशात निर्माण झालेली परिस्थितीत सुधारणा होतानाचे चित्र दिसत नाही. दिवसागणिक देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढताना दिसतोय. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशव्यापी लॉकडाउनचा निर्णय घेण्यात आला. मात्र त्यानंतरही मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ देश लॉकडाउन आहे. वेगवेगळ्या भागात शिथिलता देत लॉकडाउन हटवण्याच्या दिशेने हालचाली सुरु आहेत. याबाबत जागितक आरोग्य संघटनेनं भारताला इशारा दिलाय. लॉकडाउन हटवल्यानंतर देशात मोठ्या प्रमाणात कोरोना विषाणूची लागण झालेले रुग्ण आढळतील, अशी भिती जागतिक आरोग्य संघटनेतील एका प्रमुख अधिकाऱ्याने व्यक्त केली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांना तिहेरी धक्का; ट्विटर, फेसबुकसह इन्स्टाग्रामने केली 'ही' कारवाई
सध्याच्या घडीला भारतामध्ये कोरोनाजन्य परिस्थितीती चिंताजनक नाही. पण लॉकडाउन हटवल्याचा देशाला मोठा फटका सहन करावा लागू शकतो. कोरोनाग्रस्तांची सख्या अधिक वाढू शकते, असे जागतिक आरोग्य संघटनेतील प्रमुख अधिकाऱ्याने म्हटले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या आपतकालीन कार्यक्रमाचे प्रमुख मिशेल रियान म्हणाले की, भारतामध्ये सध्या कोरोनाग्रस्तांचा आकडा दुप्पट होण्याचा कालावधी हा तीन आठवड्यांचा आहे. शहर आणि ग्रामीण भागात खूप अंतर आहे.
कोरोनाग्रस्तांच्या यादीत भारत आता पाचव्या स्थानी
भारतासह बांगलादेश आणि पाकिस्तानमध्ये ही कोरोनाजन्य परिस्थितीने धोक्याची पातळी ओलांडलेली नाही. पण पुढील काही दिवसांत हा आकडा अचानक वाढू शकतो. या वक्तव्यातून त्यांनी लॉकडाउनसंदर्भात निर्णय घेताना काळजीपूर्वक निर्णय घेण्याची गरज असल्याचेच संकेत दिले आहेत. भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा दिवसागणिक वाढत आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी एका दिवसात 9,887 नवे रुग्ण आढळले होते. तर 294 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. या नव्या आकडेवारीसह देशात आतापर्यंत 2,36,657 लोकांना कोरोनाची लागण झाली असून 6,642 लोकांनी आपला जीव गमावला आहे.