कोरोनाने केली वाघिणीची ‘शिकार’

पीटीआय
मंगळवार, 7 एप्रिल 2020

अमेरिकेत कोरोनाच्या संसर्गाचा फटका मानवांबरोबर प्राण्यांनाही बसला आहेत. न्यूयॉर्कमधील ब्राँक्‍स प्राणी संग्रहालयातील वाघिणीची कोरोनाने ‘शिकार’ केली आहे. नादिया नावाच्या चार वर्षांच्या वाघिणीला कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले आहे. या प्राण्यांची देखभाल करणाऱ्या कर्मचाऱ्यापासून तिला हा संसर्ग झाला आहे, असे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

न्यूयॉर्क - अमेरिकेत कोरोनाच्या संसर्गाचा फटका मानवांबरोबर प्राण्यांनाही बसला आहेत. न्यूयॉर्कमधील ब्राँक्‍स प्राणी संग्रहालयातील वाघिणीची कोरोनाने ‘शिकार’ केली आहे. नादिया नावाच्या चार वर्षांच्या वाघिणीला कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले आहे. या प्राण्यांची देखभाल करणाऱ्या कर्मचाऱ्यापासून तिला हा संसर्ग झाला आहे, असे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.  

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

न्यूयॉर्कमधील ब्राँक्‍स हे प्रसिद्ध प्राणी संग्रहालय आहे. तेथील नादिया या वाघिणीला कोरोनाची लागण झाली आहे. एखाद्या प्राण्याला कोरोनाची लागण झाल्याची ही जगातील पहिलीच घटना आहे. या संग्रहालयातील प्राण्यांची देखभाल करणाऱ्या कर्मचाऱ्याला कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्याच्यापासून या वाघिणीला लागणी झाली आहे. दोघांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. त्यामुळे १६ मार्चपासून हे प्राणी संग्रहालय पूर्णपणे बंद ठेवले आहे. प्राणी संग्रहालयातील इतर कोणत्याही प्राण्यामध्ये कोरोनाची लक्षणे आढळलेली नाहीत, असे पशुवैद्यकीय सेवा प्रयोगशाळेने सांगितले.

प्राणिसंग्रहालयांना अति दक्षतेचा इशारा
नवी दिल्ली -
अमेरिकेतील प्राणी संग्रहालयात वाघिणीला कोरोनाची लागण झाल्याचे आढळल्यानंतर भारतातही चिंता वाढली आहे. देशभरातील सर्व प्राणी संग्रहालयांमध्ये अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. 

केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाने (सीझेडए) सर्व प्राण्यांवर २४ तास देखरेख ठेवण्याचा आदेश दिला आहे. देशातील तीन प्रयोगशाळांमध्ये प्राण्यांच्या कोरोना चाचणीची व्यवस्था करण्यात आली आहे. भारतातील प्राणिसंग्रहालयांना खबरदारी घेण्याचे निर्देश ‘सीझेडए’चे सदस्य सचिव एस. पी. यादव यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्रातून दिले आहे. प्राण्याला कोरोनाची लागण झाली असल्याचा संशय आला तर दर पंधरा दिवसांनी नमुने गोळा करण्याची सूचना केली आहे. आत्तापर्यंत कोरोनाचे संक्रमण मानव ते मानव असे होते. मात्र प्राण्यांनाही लागण होत असल्यास या भयंकर विषाणूच्या मुकाबल्याचे मोठे आव्हान असेल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Coronavirus Infection to tiger in newyork