वुहाननंतर 'या' शहरात कोरोनाचे थैमान; दिवसभरात मृतांची संख्या...

वृत्तसंस्था
रविवार, 22 मार्च 2020

चीनच्या वुहान शहारातून आलेला कोरोनाव्हायरस झपाट्याने जगभर परसला. इटलीमध्ये तर या विषाणूने थैमान घातले आहे. कोरोनामुळे इटलीत सर्वात जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे.

मिलान : चीनमधील वुहान शहरातून जगभर पसरलेल्या कोरोना विषाणूचा विळखा आता इटलीतील लोंबार्दी या शहराला मोठ्या प्रमाणात बसल्याचे दिसून येत आहे. याठिकाणी दर 3 मिनिटाला एकाचा मृत्यू होत असून, इटलीमध्ये गेल्या 24 तासांत 793 जणांचा मृत्यू झाला आहे. CoronaVirus

चीनच्या वुहान शहारातून आलेला कोरोनाव्हायरस झपाट्याने जगभर परसला. इटलीमध्ये तर या विषाणूने थैमान घातले आहे. कोरोनामुळे इटलीत सर्वात जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. इटलीमधील मृतांचा आकडा हा 4825 झाला आहे. जगभरात मृत्यू झालेल्यांपैकी 38 टक्के नागरिक इटलीमधील आहेत. 

वुहानमध्ये ज्या प्रमाणे हा विषाणू पसरला, तसाच इटलीतील लोंबार्दी शहरात 24 तासांत 546 म्हणजे दर 3 मिनिटाला एकाचा मृत्यू होत आहे. चीनपेक्षा इटलीची परिस्थिती बिकट बनत चालली आहे. इटलीमध्ये आतापर्यंत 53, 578 जणांना या विषाणूची बाधा झाली आहे. मिलानपेक्षा लोंबार्दीमध्ये या रोगाची लागण झालेल्यांची संख्या 3 हजारांहून अधिक झाली आहे. इटलीमध्ये शुक्रवारपासून 1420 जणांचा मृत्यू झाला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Coronavirus Italy COVID-19 Deaths Surge By 793 In A Day

टॅग्स
टॉपिकस