देशात लॉकडाउन अन् जोडप्याचे मोटारीत नको ते उद्योग...

वृत्तसंस्था
मंगळवार, 24 मार्च 2020

कोरोना व्हायरसचा इटलीला मोठा फटका बसत आहे. देशामध्ये लॉकडाउनची परिस्थिती असताना व प्रशासनाने कडक निर्बंध घालून दिलेले असतानाही एका जोडप्याचे मोटारीमध्ये नको ते उद्योग सुरू होते. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.

मिलान (इटली): कोरोना व्हायरसचा इटलीला मोठा फटका बसत आहे. देशामध्ये लॉकडाउनची परिस्थिती असताना व प्रशासनाने कडक निर्बंध घालून दिलेले असतानाही एका जोडप्याचे मोटारीमध्ये नको ते उद्योग सुरू होते. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.

मैत्रिणीला फिरायला घेऊन इटलीला गेला अन्...

स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, करोना व्हायरसने इटलीमध्ये थैमान घातले असून, मृतांचा आकडा पाच हजारांहून अधिक झाला आहे. अनेक शहरे पूर्णपणे लॉकडाउन करण्यात आली आहेत. नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी फिरवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. मिलान शहरामध्ये लॉकडाउन असताना एक जोडपे रस्त्याच्या कडेला मोटार उभी करून शारिरीक संबंध ठेवताना आढळून आले आहे. या प्रकरणी  २३ वर्षीय तरुणाला आणि ४० वर्षीय महिलेला अटक केली आहे. युवक मूळचा इजिप्तचा असून, महिला ट्यूनेशियाची आहे. मिलान शहराबाहेरील परिसरामध्ये हे दोघे मोटार रस्त्याच्या बाजूला लावून शरीरसंबंध ठेवताना अढळून आले आहेत. विशेष म्हणजे ज्या परिसरामधून त्यांना ताब्यात घेतले तेथे करोनाचा मोठा प्रादूर्भाव आहे.

हनिमूनच्या रात्री पत्नी लागली तडफडायला...

मिलान हे शहर करोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या लॉम्बार्डी प्रांतामध्ये आहे. प्रशासनाने घालून दिलेले निर्बंध मोडल्याप्रकरणी या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इटलीमध्ये एका मोटारी मध्ये दोघांना प्रवास करण्यास मनाई करण्यात आली आहे. वाहनांच्या दळणवळणावर पोलिसांची करडी नजर आहे. सध्या इटलीमध्ये केवळ जीवनावश्यक वस्तू, औषधे आणि अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्यांनाच प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.

हॉटेलवर छापा टाकताच प्रेमी युगुलांची पळापळ...

 

 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus milan couple arrested for breaching covid 19 lockdown protocol

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: