हनिमूनच्या रात्री पत्नी लागली अक्षरश: तडफडायला...

वृत्तसंस्था
Wednesday, 18 March 2020

विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पडल्यानंतर हनिमूनच्या रात्री पत्नी अक्षरशः तडफडायला लागली. उपचारासाठी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर तिला नशेची सवय असल्याची माहिती पुढे आली.

फिरोजपूर (पंजाब): विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पडल्यानंतर हनिमूनच्या रात्री पत्नी अक्षरशः तडफडायला लागली. उपचारासाठी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर तिला नशेची सवय असल्याची माहिती पुढे आली.

साहेब, तिला दुसऱयासोबत लग्न करायचं होत म्हणून...

दोघांचा विवाह मोठ्या उत्साहात पार पडला होता. नवविवाहीता सासरी आल्यानंतर हनिमूनची तयारी करण्यात आली होती. नवविवाहीता तिच्या खोलीत बसली होती. नवरा खोलीमध्ये गेल्यानंतर त्याने पत्नीला स्पर्श केला. त्यानंतर तिने गोंधळ घालण्यास सुरुवात केली. हातातील बांगड्या फेकून दिल्या आणि जोरजोरात ओरडण्यास सुरुवात केली. नवरा तर घाबरूनच गेला. शिवाय, तिचा अवतार पाहून कुटुंबातील सर्वजण हादरले. तिने ड्रग्जची मागणी केली. ड्रग्ज मिळत नसल्यामुळे ती तडफडू लागली. घाबरलेल्या कुटुंबियांनी तिला नशामुक्ती केंद्रात नेले. तेथे उपचार केल्यानंतर तिला शांत करण्यात आले.

हनिमूनच्या तयारीत असताना मिळाली पत्नीची 'ती' क्लिप...

सासू व सासऱ्यांनी सांगितले, 'आमच्या मुलासोबत काही दिवसांपूर्वीच या मुलीशी विवाह झाला आहे. मुलीला नशेचे व्यसन आहे हे आमच्यापासून लपविण्यात आले होते. युवती आमच्या घरी आल्यावर नशेची मागणी करून जोर-जोरात ओरडत होती. तिने बांगड्या काढून फेकल्या. ड्रग्जसाठी अक्षरशः पाया पडत होती, विनवण्या करत होती. ते पाहून मुलास धक्का बसला. तो तिला माहेरी पाठवून द्या, असे म्हणत होता. पंरतु, आम्ही त्याची समजूत काढत नशामुक्ती केंद्रात आणले.'

'त्या' अवस्थेतही दोघे एकमेकांकडेच पाहात होते...

डॉक्टरांनी सांगितले की, 'युवतीला गेल्या दोन वर्षांपासून ड्रग्जचे व्यसन आहे. नशा पूर्ण न होऊ शकल्यामुळे तिची तडफड झाली. उपचार केल्यानंतर ती शांत झाली. नशेचे व्यसन हा आजार आहे. सासरकडील व्यक्तींना समजावून सांगितल्यानंतर त्यांनी उपचार करू म्हणून सांगितले.'

रुग्णालयात दोघांना रंगेहाथ पकडले अन्...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bride did a high profile drama on the her honeymoon at punjab