
...अन् महिलेला विमानाच्या बाथरूममध्येच व्हावे लागले आयसोलेट
वॉशिंग्टन : मिशिगनमधील महिलेने बोर्डिंग करण्यापूर्वी विमानतळावर दोन आरटीपीसीआर आणि पाच जलद चाचण्या केल्या होत्या. सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. परंतु, फ्लाइटमध्ये सुमारे दीड तासानंतर त्यांनी घसा दुखत असल्याची तक्रार केली. पुन्हा रॅपिड टेस्ट केल्यानंतर अहवाल पॉझिटिव्ह (corona report positive) आला. कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर महिलेला फ्लाइटच्या बाथरूममध्ये आयसोलेशन (Isolate in the bathroom) करावे लागले.
द ट्रिब्यूनच्या वृत्तानुसार, कोरोनाचा नवीन प्रकार ओमिक्रॉन (omicron variant) जगभरात हाहाकार माजवत आहे. त्यामुळे बहुतांश देशांनी विमानतळावर (Air travel) कोरोना नियम, आयसोलेशन आणि कोविड चाचणी अनिवार्य केली आहे. शिकागोहून आइसलँडच्या विमान प्रवासादरम्यान कोविड चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर (corona report positive) अमेरिकन महिलेला फ्लाइटच्या बाथरूममध्ये पाच तास (Isolate in the bathroom) वेगळे ठेवण्यात आले होते.
हेही वाचा: मध्यरात्री घरात शिरलेल्या चोरट्यांनी महिलेच्या तोंडावर गोळ्या झाडल्या
मिशिगनमध्ये शिक्षिका असलेली मारिसा फोटोयो यांचा १९ डिसेंबर रोजी प्रवासादरम्यान घसा दुखू लागला. त्यामुळे त्या कोविड चाचणी करण्यासाठी पटकन बाथरूममध्ये गेल्या. यावेळी त्यांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. विमानतळावर दोन आरटीपीसीआर चाचण्या आणि ५ जलद चाचण्या केल्या होत्या. सर्वांचा अहवाल निगेटिव्ह आला. मात्र, विमान प्रवासात सुमारे दीड तासानंतर घसा दुखू लागल्याने पुन्हा रॅपिड टेस्ट केली. यावेळी अहवाल पॉझिटिव्ह (corona report positive) आला, असे फोटोयो यांनी सांगितले.
विमानात बसल्यानंतर काही समस्या जाणवत होत्या. मनात अनेक गोष्टी धावत होत्या. मग मी स्वतःला धीर दिला आणि अजून एकदा चाचणी केली. परंतु, माझा अहवाल पॉझिटिव्ह आला. मला कोरोनाची लागण झाली होती, असे मारिसा फोटोयो यांनी सांगितले. कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. बूस्टर डोसही घेतला आहे. दर आठवड्याला कोरोना चाचणी करून घेते, असेही त्यांनी सांगितले.
Web Title: Coronavirus Omicron Variant Isolate In The Bathroom Air Travel Corona Report Positive
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..