आफ्रिकेहून विमान नेदरलँडमध्ये; प्रवाशांना ओमिक्रॉन झाल्याची भीती

Aircraft
AircraftAircraft

दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा (Coronavirus) नवीन विषाणू ओमिक्रॉन (Omicron Variant) आढळून आला आहे. सोबतच तीन ते चार देशात याचे रुग्ण आढळल्यानंतर सरकार आवश्यक ती काळजी घेत आहे. आफ्रिकेत (South Africa) जाण्यात आणि तेथील विमानांना दुसऱ्या देशात येण्यास बंदी घातली आहे. असे असतानाही दक्षिण आफ्रिकेतून दोन विमान नेदरलँडच्या (Netherlands) ॲमस्टरडॅमला उतरले. यामुळे ८५ जणांना ओमिक्रॉनची लागण झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

आफ्रिकेतील फ्लाइट्सवरील सर्व लोकांची तपासणी केली जात असली तरी, सुमारे ६०० प्रवासी असलेले केएलएमचे दोन विमान ॲमस्टरडॅमच्या शिफोल विमानतळावर उतरले. नेदरलँड आरोग्य अधिकाऱ्यांच्या अंदाजानुसार यातील ८६ लोकांना ओमिक्रॉनची लागण झाल्याचे सांगितले जात आहे. नेदरलँड्समध्ये येणाऱ्या प्रवाशांना चाचण्या आणि अलगावला सामोरे जावे लागेल, असे आरोग्य मंत्री ह्यूगो डी जोंग यांनी सांगितले.

Aircraft
फोडाफाडीची भीती; काँग्रेसचे उमेदवार जाणार अज्ञान स्थळी

आफ्रिकेतून येणाऱ्या विमानातील सर्व प्रवाशांची तपासणी केली जात आहे. केनेमरलँडच्या आरोग्य अधिकाऱ्याने सांगितले की, डच शैक्षणिक वैद्यकीय रुग्णालयाद्वारे पॉझिटिव्ह प्रकरणाचे विश्लेषण केले जात आहे. मोठ्या संख्येने प्रवासी ओमिक्रॉन पॉझिटिव्ह आढळल्यास चिंता निर्माण होईल. डचच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले की, डच सरकारने शुक्रवारी रात्री बार, रेस्टॉरंट्स आणि बहुतेक दुकाने बंद ठेवण्याची घोषणा केली. देशाल कोविड-१९ च्या महामारीचा सामना करीत आहे. यामुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आलेला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com