कोरोना रुग्ण वेंटिलेटर काढताच गर्लफेंडला म्हणाला...

वृत्तसंस्था
गुरुवार, 21 मे 2020

एका युवकाला कोरोनाची लागण झाली होती. रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याला वेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. दिवसेंदिवस त्याची प्रकृती गंभीर होत चालली होती. पण, प्रकृती सुधारल्यानंतर वेंटिलेटर काढल्यानंतर प्रथम त्याने मैत्रिणीला फोन करून लग्नाची मागणी घातली. कोरोनाग्रस्त युवकाची लव्हस्टोरी सोशल मीडियावर रंगली आहे.

लंडन : एका युवकाला कोरोनाची लागण झाली होती. रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याला वेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. दिवसेंदिवस त्याची प्रकृती गंभीर होत चालली होती. पण, प्रकृती सुधारल्यानंतर वेंटिलेटर काढल्यानंतर प्रथम त्याने मैत्रिणीला फोन करून लग्नाची मागणी घातली. कोरोनाग्रस्त युवकाची लव्हस्टोरी सोशल मीडियावर रंगली आहे.

हेल्मेट ओळखणार कोरोनाची लक्षणं...

डेली स्टारने दिलेल्या वृत्तानुसार, कोरोनाग्रस्त रुग्णांची प्रकृती खूप गंभीर झाल्यामुळे त्याला वेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. उपचारादरम्यान त्याच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होऊ लागल्याने वेंटिलेटर काढण्यात आले. वेंटिलेटर काढल्यानंतर त्याने सर्वात प्रथम मैत्रिणीला व्हिडिओ कॉल केला आणि विवाहाची मागणी घातली. विशेष म्हणजे त्याच्या मैत्रिणीने सुद्धा त्याला तत्काळ होकार दिला. यामुळे फक्त त्या रुग्णालाच नव्हे तर रुग्णालयातील इतर कर्मचाऱ्यांनाही आनंद झाला.

माझे रडून झाले, आता तुझी रडण्याची वेळ...

दरम्यान, लंडनच्या रुग्णालयात आयसीयूमध्ये असेलल्या रुग्णांना टॅबलेट्स देण्यात आले आहेत. यामुळे रुग्णांना आपल्या प्रियजनांना व्हर्च्युअल भेटता येईल, त्यांच्याशी बोलता येईल. पण, एखादा रुग्ण वेंटिलेटरवरून उठताच आपल्या कुटुंबाला संपर्क न करता मैत्रिणीला फोन लावून प्रपोज केल्याची घटना प्रथमच घडली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus patient comes off ventilator and proposes girlfriend for marriage via video call