माझे रडून झाले, आता तुझी रडण्याची वेळ...

वृत्तसंस्था
गुरुवार, 21 मे 2020

माझे रडून झाले, आता तुझी रडण्याची वेळ आहे, प्रेयसीने अशी चिठ्ठी लिहून प्रियकराच्या घराबाहेर एक हजार किलो कांदे ठेवले. संबंधित छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

बिजिंग (चीन): माझे रडून झाले, आता तुझी रडण्याची वेळ आहे, प्रेयसीने अशी चिठ्ठी लिहून प्रियकराच्या घराबाहेर एक हजार किलो कांदे ठेवले. संबंधित छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

Video: पत्नी माझ्याशी भांडली हो...

स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, झाओ असे प्रेयसीचे नाव आहे. दोन वर्षे प्रियकरासोबत राहात होते. पण, काही दिवसांपासून त्यांचे भांडण होऊ लागले. प्रियकर तिला सोडून निघून गेला. यामुळे अनेक दिवस ती रडत होती. प्रियकराने आपल्याला रडवले आता त्यालाही रडवायचे, असे तिने ठरवले. कांद्याची डिलिव्हरी करणाऱया व्यक्तीला पत्ता देऊन त्याच्या घराबाहेर एक हजार किलो कांदे ठेवायचे म्हणून सांगितले. शिवाय, एक चिठ्ठीही दिली. डिलिव्हरी करणाऱया व्यक्तीला पैसे आणि पत्ता दिल्यानंतर त्याने संबंधित ठिकाणी जाऊन कांद्याच्या गोण्या आणि चिठ्ठी ठेवली. प्रियकराने दरवाजा उघडल्यानंतर त्याला धक्काच बसला. चिठ्ठी हातात घेतली आणि काही वेळ त्यालाही रडू कोसळले.

...अन् वर्गात मध्येच सुरू झाला अश्लिल व्हिडिओ

झाओने चिठ्ठीत लिहीले होते की,  "मी खूप रडले, आता तुझी रडण्याची वेळ आली आहे." प्रियकराच्या कुटुंबियानी याबातची चौकशी केली. यावेळी त्याने सांगितले की, 'माझी प्रेयसी खूपच नौटंकी होती. ती सर्वांना सांगत आहे की ब्रेक-अपनंतर तो एकदाही रडला नाही. मी रडत नाही म्हणून मी एक वाईट व्यक्ती आहे? ' पण, या कांद्यांच्या ढिगामुळे शेजारी राहणाऱया नागरिकांना रडू कोसळले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: girlfriend sends a tonne of onions to ex boyfriend at china

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: