esakal | Coronavirus : भारतात कोरोना रुग्णांमध्ये वाढ पण, WHOकडून मोदींचे कौतुक
sakal

बोलून बातमी शोधा

who and narendra modi.jpg

जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) प्रमुख टेड्रोस ऐडनम घेब्रेसस यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आहे.

Coronavirus : भारतात कोरोना रुग्णांमध्ये वाढ पण, WHOकडून मोदींचे कौतुक

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

जिनिव्हा- जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) प्रमुख टेड्रोस ऐडनम घेब्रेसस यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले होते की भारत आपल्या उत्पादन क्षमतेचा वापर कोविड-19 विरोधात लढण्यासाठी देशांच्या मदतीसाठी करेल. टेड्रोस म्हणाले की ''महामारीविरोधात एकजुटीनेच मात करता येईल, त्यामुळे सर्वांच्या हितासाठी देशांच्या संसाधनांचा वापर केला जायला हवा. पंतप्रधान मोदी मदतीसाठी पुढे आले आहेत, त्याबद्दल त्यांचे आभार.''

...तर PM किसान योजनेचे 6000 रुपये परत घेतले जाणार

सर्वांसाठी केला जाईल वापर

संयुक्त राष्ट्र संघटनेच्या 75 व्या असेंबलीच्या सत्रात पंतप्रधान मोदी यांनी शनिवारी संवाद साधला. भारतामध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना लशीचे उत्पादन होणार आहे. त्यामुळे भारताच्या या उत्पादन क्षमतेचा वापर जगासाठी केला आहे, याचे मी आश्वासन देतो. कोरोना महामारीविरोधात लढण्यासाठी भारत सर्व देशांना मदत करेल, असं मोदी म्हणाले होते. 

150 देशांना मदत

कठीण प्रसंगात असतानाही भारताच्या फार्मा कंपन्यांनी 150 देशांना आवश्यक ती मदत केली आहे, असं मोदी म्हणाले होते. यावर प्रतिक्रिया देताना टेड्रोस यांनी ट्विट केलं आहे. पंतप्रधान मोदी यांनी जे मदतीचे आश्वासन दिले त्यांबद्दल त्यांचे धन्यवाद. सर्वांनी मिळून आपल्या संसाधनांचा वापर केल्यास आपण कोरोना महामारीला हरवू शकतो, असं टेड्रोस म्हणाले आहेत. 

फडणवीसांच्या भेटीबद्दल उद्धव ठाकरेंना कल्पना होतीः संजय राऊत

यूएनवर मोदींचा निशाणा

पीएम मोदी यांनी संयुक्त राष्ट्रावर निशाणा साधला. गेल्या 8 ते 9 महिन्यांपासून सर्व जग कोरोना महामारीविरोधात संघर्ष करत आहे. या वैश्विक महामारीशी दोन हात करताना यूएन कोठे होते? त्यांचा प्रभावशाली रिस्पॉन्स कोठे होता? आणखी किती वर्ष भारताला यूएनपासून दूर राहावं लागेल? असे प्रश्न मोदी यांनी केले होते. 

दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना महामारी संबंधात वारंवार जगाला सतर्क केले आहे. कोरोना विषाणू अजून खूप काळ आपल्यासोबत राहणार आहे. शिवाय कोरोनाची प्रभावी लस येईपर्यंत जवळजवळ 20 लाख लोकांचा मृत्यू होईल, असा अंदाज WHO ने व्यक्त केला आहे. जगभरात कोरोना महामारीचा प्रकोप वाढत आहे. योग्य ती खबरदारी घेऊनच आपण कोरोना विषाणूला रोखू शकतो, असं टेड्रोस म्हणाले होते.

(edited by- kartik pujari)