कोरोनाचा हाँगकाँगमध्ये कहर; कुत्र्यालाही लागण?

वृत्तसंस्था
शनिवार, 29 फेब्रुवारी 2020

हाँगकाँगमध्ये एका पाळीव कुत्र्याला या व्हायरसची लागण झाल्याचे सांगण्यात येत असून, प्राण्यांनाही या व्हायरसची लागण झाल्याची ही पहिलीच घटना आहे. त्याला प्राण्यांच्या रुग्णालयात ठेवण्यात आले आहे.

बँकॉक : चीनमध्ये हजारो नागरिकांचा कोरोनाने मृत्यू झाल्यानंतर हाँगकाँगमध्येही या व्हायरसने कहर केल्याचे स्पष्ट होत असून, कुत्राही या व्हायरसची लागण झाल्याचे समोर येत आहे.

हाँगकाँगमध्ये एका पाळीव कुत्र्याला या व्हायरसची लागण झाल्याचे सांगण्यात येत असून, प्राण्यांनाही या व्हायरसची लागण झाल्याची ही पहिलीच घटना आहे. त्याला प्राण्यांच्या रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. एका 60 वर्षांच्या महिलेच्या घरातील हा पाळीव कुत्रा असून, त्या महिलेला मात्र कोरोनाची लागण झाली नसल्याचे तपासणीत स्पष्ट झाले आहे. 

बुधवारी सुरवातीला या कुत्र्याला लागण झाल्याचा संशय आल्यानंतर त्याला लगेच पशुवैद्यकीय केंद्रात हलविण्यात आले. तेथे त्याच्या तपासण्या होणार आहेत. शास्त्रज्ञांनी मात्र मनुष्यांमध्ये वेगाने पसरत असलेल्या या व्हायरसची लागण जनावरांना होणार नसल्याचे म्हटले होते. चीनसह इटली, इराणमध्ये या व्हायरसची लागण होण्याची प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Coronavirus Patients Pet Dog Tests Positive for Low Level of Virus

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: