मेट्रोत कोरोना-कोरोना म्हणून ओरडला अन्...

वृत्तसंस्था
गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020

मेट्रोत प्रवेश केल्यानंतर कोरोना-कोरोना ओरडत खाली पडला. प्रवासी घाबरून बाहरे पडले. संबंधित व्हिडिओ व्हायरल झाला असून, युवकाला कारवाईला सामोरे जावे लागले आहे.

मॉस्को (रशिया): मेट्रोत प्रवेश केल्यानंतर कोरोना-कोरोना ओरडत खाली पडला. प्रवासी घाबरून बाहरे पडले. संबंधित व्हिडिओ व्हायरल झाला असून, युवकाला कारवाईला सामोरे जावे लागले आहे.

चीनमध्ये कोरोना नावाच्या व्हायरसने थैमान घातले आहे. या व्हायरसमुळे अनेकांना जीव गमवावा लागला असून, अनेकांना या रोगाची भिती आहे. या रोगाची भिती दाखवून चेष्टा करणे महागात पडले आहे. युवकाला 5 वर्षांचा कारावास आणि 5.5 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

संबंधित व्हिडिओमध्ये एक युवक मास्क लावून मेट्रोत येतो आणि लोकांच्या समोर पडतो. त्यानंतर दुसरा एक तरुण तिथे येऊन मोठमोठ्याने कोरोना-कोरोना ओरडत धावू लागतो. यामुळे मेट्रोतील इतर प्रवासी घाबरतात आणि जीव वाचवण्यासाठी पळू लागतात. पोलिसांनी हा प्रँक व्हिडिओ बनवणाऱ्या प्रँकस्टारला अटक केली आहे. शिवाय त्याच्या इतर 2 साथीरांचाही शोध सुरू आहे.

प्रँक बनवणाऱ्या तरुणाच्या वकिलाने सांगितल की, 'या तरुणाविरोधात पोलिसांनी वॉरंट जारी केल्यानंतर युवक स्वतःहून पोलिसांसमोर हजर झाला आहे. एका छोट्याशा चेष्टेमुळे प्रवाशांना त्रास होईल याचा विचारही त्याने केला नव्हता. त्याला फक्त नागरिकांना सावध करायचे होते.'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus prank video metro moscow russia

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: