कोरोनाचा नवा स्ट्रेन आता रशियात; तर चीनमध्ये गेल्या 5 महिन्यातील सर्वधिक रुग्णांची नोंद

सकाळ वृत्तसेवा
Monday, 11 January 2021

रशियातील मॉस्कोमध्ये रविवारी कोरोनाच्या नव्या स्ट्रेनने बाधित पहिला रुग्ण आढळला आहे.

नवी दिल्ली : रशियातील मॉस्कोमध्ये रविवारी कोरोनाच्या नव्या स्ट्रेनने बाधित पहिला रुग्ण आढळला आहे. अधिकाऱ्यांद्वारे आधीच खबरदारी म्हणून ब्रिटनसोबत असलेली सर्व प्रकारची वाहतुक थांबवण्यात आली होती. मात्र, तरीही कोरोनाचा नवा स्ट्रेन रशियात आढळला आहे. तर दुसरीकडे कोरोनाची जननी म्हणवल्या जाणाऱ्या चीनमध्ये गेल्या पाच महिन्यातील सर्वाधिक रुग्णवाढ आज सोमवारी पहायला मिळाली. बीजिंगच्या जवळ असणाऱ्या हेबेई प्रांतात नवीन संसर्ग वाढतच चालले आहेत.  या पार्श्वभूमीवर चीनच्या अनेक शहरांमध्ये पुन्हा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. 

ब्रिटनहून रशियात परतणाऱ्या एका व्यक्तीला कोरोनाच्या या नव्या स्ट्रेनची बाधा झाली आहे. रशियाची आरोग्य यंत्रणेचे प्रमुख अण्णा पोपोवा यांनी सांगितले. मॉस्कोच्या अधिकाऱ्यांनी डिसेंबरमध्ये ब्रिटनमधून होणारी हवाई वाहतुक बंद केली होती. नव्या स्ट्रेनच्या पार्श्वभूमीवर इतर अनेक देशांनीही याच प्रकारची पाऊलं उचलली होती. काल रविवारी रशियामध्ये कोरोनाचे नवे 22,851 रुग्ण सापडले आहेत. या नव्या रुग्णांसह देशातील एकूण आजवरच्या रुग्णांची संख्या ही 3,401,954 वर जाऊन पोहोचली आहे. 

हेही वाचा - Corona Update : रुग्णवाढीचा दर 20 हजारांच्याही खाली; PM मोदींची राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी बैठक

चीनच्या नॅशनल हेल्थ कमीशनने सांगितलं की, हुबेईमध्ये कोरोनाचे नवे 85 रुग्ण सापडले आहेत. यामध्ये 82 रुग्णांची नोंद 10 जानेवारीला झाली आहे. चीनच्या लायनिंग प्रांतात दोन बीजिंगमध्ये 1 रुग्ण सापडला आहे. चीनमध्ये इतर देशातून आलेल्या 18 लोकांना देखील कोरोना संसर्ग झाल्याचे आढळले आहे.

रशिया हा देशदेखील सर्वाधिक संक्रमण असणाऱ्या देशांमधील एक देश आहे. अधिकाऱ्यांनी काल रविवारी आतापर्यंतच्या जवळपास 3.5 मिलीयन केसेसची नोंद केली आहे. आरोग्य अधिकाऱ्यांनी मागच्या महिन्यात सांगितलं की कोरोना प्रकरणांची संख्या रशियात वाढती आहे. तसेच रशिया हा जगातील सर्वाधिक कोरोना प्रभावित देशांमधील तिसऱ्या क्रमांकावर असलेला देश आहे. रशियाने लॉकडाऊन लागू करण्याऐवजी आपल्या स्वदेशी स्फुटनिक-व्ही लशीवर विश्वास ठेवत कोरोनाशी लढा चालू ठेवला आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus Russia confirms first case of new strain China biggest daily case rise in 5 months