Corona Update : रुग्णवाढीचा दर 20 हजारांच्याही खाली; PM मोदींची राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी बैठक

सकाळ वृत्तसेवा
Monday, 11 January 2021

महाराष्ट्र राज्यात काल 2302 रुग्ण बरे झाले आहेत.

नवी दिल्ली : लसीकरणाच्या कार्यक्रमाबाबत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोमवारी देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेणार आहेत. आज सोमवारी संध्याकाळी चार वाजता ही बैठक नियोजित आहे. व्हिडीओ कॉन्फरंन्सिंगद्वारे ही बैठक होणार आहे. भारतातील कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात देशातील तीन कोटी आरोग्य कर्मचाऱ्यांना तसेच फ्रंटलाईन वर्कर्सना कोरोनावरील लस मोफत दिली जाणार आहे. 

गेल्या 24 तासांत भारतात 16,311 नवे कोरोना रुग्ण सापडले आहेत. या नव्या रुग्णांसह देशातील आजवरच्या एकूण रुग्णांची संख्या ही 1,04,66,595 वर जाऊन पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत 19,299 रुग्णांचा डिस्चार्ज दिला गेला आहे. या नव्या बऱ्या झालेल्या रुग्णांसह देशातील एकूण बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या ही 1,00,92,909 वर जाऊन पोहोचली आहे. देशात गेल्या 24 तासांत 161 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या नव्या मृतांसह देशातील एकूण आजवरच्या मृतांची संख्या ही 1,51,160 वर जाऊन पोहोचली आहे. सध्या देशात 2,22,526 रुग्ण ऍक्टीव्ह आहेत. याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. 

गेल्या 24 तासांत 6,59,209 नव्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. 10 जानेवारीपर्यंत भारतात कोरोनाच्या एकूण 18,17,55,831 चाचण्या केल्या गेल्या आहेत. याबाबतची माहिती Indian Council of Medical Research (ICMR) दिली आहे.
काल दिवसभरात महाराष्ट्रात नवे 3558 रुग्ण आढळून आले आहेत. या नव्या कोरोना रुग्णांसह राज्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ही 19,69,114 वर जाऊन पोहोचली आहे.

हेही वाचा - PM मोदींची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी बैठक; लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर तयारीचा घेणार आढावा

राज्यात काल 2302 रुग्ण बरे झाले आहेत. या नव्या बऱ्या झालेल्या रुग्णांसह राज्यातील एकूण आजवरच्या बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या ही 18,63,702 वर जाऊन पोहोचली आहे. काल राज्यात 34 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. या नव्या मृतांसह राज्यातील एकूण आजवरच्या कोरोनाबाधित मृतांची संख्या ही 50,061 वर जाऊन पोहोचली आहे. सध्या राज्यात 54,179 रुग्ण ऍक्टीव्ह आहेत.

देशात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणास सुरवात होणार आहे. त्याआधीच अनेक राज्यांकडून म्हटलं गेलंय की पहिल्या टप्प्यातील लसीकरणासाठी आवश्यक ती सर्व तयारी पूर्ण झाली आहे. यामध्ये लसीकरणाचे ठिकाण तसेच आरोग्य कर्मचाऱ्यासमवेत कोरोनाविरोधातील लढाईमध्ये फ्रंटलाईन वर्कर्सचे नोंदणीकरण करणे या साऱ्या बाबींचा समावेश आहे. 
 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Update India Report in marathi 11 January 2021