Coronavirus:कोरोना व्हायरस हे चीनचं पाप; चिनी संशोधकांचा दावा

टीम ई-सकाळ
मंगळवार, 18 फेब्रुवारी 2020

कधी चीनमधल्या खाद्य संस्कृतीकडं बोट केलं जातं तर, कधी चीननं जैविक अस्त्र म्हणून, कोरोना व्हायरस कसा तयार केला होता, असाही आरोप केला जातो.

बीजिंग (चीन) Coronavirus:चीनमधील कोरोना व्हायरसनं जगाची चिंता वाढवलीय. या व्हायरसमुळं आजवर जवळपास 1800 लोकांना आपला प्राण मगवावा लागलाय. तर, जगभरातील जवळपास 70 हजार जणांना याची लागण झालीय. त्यामुळं अनेक जण मृत्यूच्या उंबरठ्यावर आहेत. चीनच्या हुबेई प्रांतात हा व्हायरस पसरला आहे. आता हा व्हायरस मुळात आला कोठून यावरून चर्चा सुरू झाली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोणी केला दावा
कोरोना व्हायरस संदर्भात सोशल मीडियावर माहिती शेअर होत असते. पण, त्याला कोणताही दुजोरा नाही. कधी चीनमधल्या खाद्य संस्कृतीकडं बोट केलं जातं तर, कधी चीननं जैविक अस्त्र म्हणून, कोरोना व्हायरस कसा तयार केला होता, असाही आरोप केला जातो. पण, यातलं खरं कारण काय हे कोणीही स्पष्ट केलेलं नाही. चीन सरकारही यावर अद्याप मूग गिळून गप्प आहे. या संदर्भात डेली मेल या वृत्त पत्राने त्यांच्या वेबसाईटवर एक बातमी प्रसिद्ध केलीय. त्यात वुहान शहरातूनच या व्हायरसचा फैलाव झाल्याचा दावा चीनमधीलच दोघा शास्त्रांनी केलाय. बोटाओ शिआओ आणि ली शिआओ, या दोघा संशोधकांनी हा दावा केला आहे. 

आणखी वाचा - जपाननं कोरोनाग्रस्त जहाजावर वाटले 2 हजार आयफोन

काय आहे संशोधकांचे म्हणणे?
बोटाओ शिआओ आणि ली शिआओ, यांनी म्हटले आहे की, वुहानमधील मच्छी बाजारापासून 300 यार्डावर असलेल्या एका लॅबमधून या व्हायरसचा फैलाव झाला असण्याची दाट शक्यता आहे. वुहान सेंटर फॉर डिसिज् कंट्रोल या संस्थेच्या लॅबमध्ये कोरोना व्हायरसची लागण झालेले प्राणी तसेच ठेवण्यात आले होते. ही शास्त्रज्ञांची मोठी चूक होती. त्यात 605 वटवाघुळं होती. यातल्या कोरोनाग्रस्त वटवाघुळाने लॅबमधील एका संशोधकावर हल्ला केला होता. त्याचं रक्त संशोधकाच्या अंगावर पडलं होतं. सुरुवातीला वटवाघुळाचं मांस खाऊन कोरोना व्हायरसचा फैलाव झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. या संशोधकांच्या म्हणण्यानुसारही कोरोना व्हायरस मागे वटवाघुळाचा काही तरी संबंध असल्याचे दिसत आहे. अद्याप यावर चीन सरकारने किंवा जगातील इतर संशोधकांनी कोणतिही प्रतिक्रिया दिलेली नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus spread from Chinese laboratory wuhan city Scientists claim