Coronavirus: कोरोनाग्रस्त डायमंड प्रिन्सेस जहाजावर जपाननं वाटले 2 हजार आयफोन

टीम ई-सकाळ
सोमवार, 17 फेब्रुवारी 2020

डायमंड क्रूझ हे जहाज 4 फेब्रुवारी रोजी जपानच्या योकोहामा बंदरावर जाऊन धडकले. जहाजावर 3 हजार 700 प्रवासी आहेत.

टोकियो (जपान) : जपानच्या समुद्रकिनाऱ्यावर येऊन थांबलेल्या डायमंड प्रिन्सेस या प्रवासी जहाजावर कोरोना व्हायरसनं शिरकाव केलाय. या जहाजावरील प्रवाशांना जपामध्ये प्रवेश देण्यास नकार देण्यात आलाय. पण, जहाजावरील प्रवाशांचा संताप पाहून जपान सरकारनं त्यांना शांत करण्यासाठी वेगळीच क्लुप्ती लढवलीय. जपाननं जहाजावर एक दोन नव्हे तर दोन हजार आयफोन फुकट दिले आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भारतीय प्रवासी अडकले
डायमंड क्रूझ हे जहाज 4 फेब्रुवारी रोजी जपानच्या योकोहामा बंदरावर जाऊन धडकले. जहाजावर 3 हजार 700 प्रवासी आहेत. पण, त्यांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचा संशय असल्यामुळं जपान सरकारनं प्रवाशांना जपानमध्ये प्रवेश नाकारला. त्यामुळं सर्व 3 हजार 700 प्रवासी जहाजावर अडकून पडले आहेत. जपान सरकार त्यांना जीवनावश्यक वस्तू आणि औषधांचा पुरवठा करत आहे. तसेच प्रवाशांची आरोग्य चाचणीही घेण्यात येत आहे. या सगळ्यात  355 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. जहाजावर 138 भारतीय प्रवासी आहेत. त्यात आठ प्रवासी तर, इतर क्रू मेंबर्स आहेत. दरम्यान, अमेरिकेने जहाजावरील आपल्या 400 जणांची सुटका करण्याची तयारी सुरू केली आहे.

आणखी वाचा - जपानमध्ये डायमंड प्रिन्सेस जहाजावर चिंताजनक स्थिती

आयफोन कशासाठी?
जपान सरकारने जहाजावरील प्रवाशांना शांत ठेवण्याचे प्रयत्न सुरू केला आहेत. त्यासाठी जहाजावर 2 हजार आयफोन फुकट वाटण्यात येत आहेत. जपानच्या आरोग्य आणि कामगार कल्याण विभागाकडून हे आयफोन देण्यात आले आहेत. हे आयफोन देताना प्रवाशांना मेडिकल ऑफिसर्सशी संवाद साधणं सोपं जावं, त्यांना आरोग्य अधिकाऱ्यांची वेळ घेता यावी, औषधे मागवता यावीत, तसेच कोणत्याही वेळी चॅट करता यावं, यासाठी हे आयफोन देण्यात येत असल्याचं स्पष्टीकरण जपानच्या आरोग्य विभागानं दिलंय.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: diamond princess cruise japan 2 thousand phones distributed