
- पाकिस्तानातील शाळांना सुट्टी
बीजिंग : चीनमध्ये कोरोना व्हायरसमुळे आत्तापर्यंत दगावणाऱ्यांची संख्या दोन हजार 800 इतकी झाली आहे. तर कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 81 हजार इतकी झाली असल्याची माहिती देण्यात आली आहे.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
कोरोना व्हायरच्या प्रकरणांमध्ये झपाट्याने होत आहे. यामध्ये 81 हजार प्रकरणं समोर आली आहेत. यातील विशेष बाब म्हणजे एकट्या चीनमध्ये 78 हजार प्रकरणं समोर आली आहेत. तर या व्हायरसची लागण झाल्याने आत्तापर्यंत जगभरातील 2800 लोकांचा मृत्यू झाला. तर चीनमध्ये 2500 हून अधिक रुग्ण दगावले आहेत. यातील मृत झालेल्या रुग्ण आणि लागण झालेल्या लोकांची सर्वाधिक संख्या ही चीनमध्ये असल्याची माहिती मिळत आहे. तसेच ब्राझीलमधील लॅटिन अमेरिकेत पहिला कोरोनाग्रस्त रुग्ण आढळला आहे.
पाकिस्तानातील शाळांना सुट्टी
कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. तसेच पाकिस्तानातही याचे दोन प्रकरणं समोर आली आहेत. त्यामुळे खबरदारी म्हणून पाकिस्तानातील काही शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.
कोरोनामुळे दोन हजार ४४२ जणांचा मृत्यू