मोठी बातमी : हँड सॅनिटायझरमुळं कॅन्सरचा धोका; संशोधनातील निष्कर्ष

Corona_Hand_sanitizer
Corona_Hand_sanitizer
Updated on

वॉशिंग्टन - कोरोना व्हायरसवर सध्या जगात लसीकरण मोहिम सुरु आहे. असे असले तरीही कोरोनापासून वाचण्यासाठी मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंग या गोष्टी महत्वाच्या आहेत. जागतिक आरोग्य संघटनेनंसुद्धा मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करा असं आवाहन नागरिकांना केलं आहे. यात सॅनिटायझरचा वापर हात स्वच्छ करण्यासाठी सतत करा असंही सांगण्यात आलं आहे. दरम्यान, सॅनिटायझरमध्ये कर्करोगाला कारणीभूत असे काही घटक असल्याचं समोर आलं होतं.  कनेक्टीकट बेस्ड ऑनलाइन फार्मसी फर्मन असलेल्या वॅलिसरने असं म्हटलं आहे की, हँड सॅनिटायझरचा वापर वाढल्यानंतर बाजारात बेंझेन कमी दिसायला लागले आहे. कर्करोग होण्यास कारणीभूत ठरणाऱ्या घटकांमध्ये बेंझेन हे एक केमिकल असल्याचं अमेरिकेच्या आरोग्य विभागानं सांगितलं होतं. इतकंच काय तर जागतिक आरोग्य संघटनेच्या कॅन्सर रिसर्चनेसुद्धा याचा समावेश हाय रिस्क कॅटेगरीत केला आहे. 

वॅलिसरने जवळपास 168 ब्रँडच्या 260 सॅनिटायझरवर संशोधन केलं. त्यापैकी 17 टक्के नमुन्यांमध्ये बेंझीनचा अंश असल्याचं आढळलं आहे. तर 21 बॉटल्समध्ये बेंझीन प्रति मिलियनमागे दोन पार्टमध्ये आढळल आहे. एफडीएने हँड सॅनिटायजऱमध्ये हे प्रमाण तात्पुरत्या काळासाठी चालेल असं सांगितलं जून 2020 मध्ये सांगितलं होतं.

सॅनिटायझर तयार करणाऱ्या 18 ब्रँडच्या 21 बॉटल्समध्ये हे प्रमाण जास्त आढळलं होतं. संशोधनासाठी ज्या बॉटल्स घेण्यात आल्या होत्या त्या वॅलिसरच्या मुख्यालयाजवळ आजुबाजुला असलेल्या स्टोअर्समधून खरेदी करण्यात आल्या होत्या.  वॅलिसरने त्यांच्या रिपोर्टनंतर यादीसह एफडीएकडे याचिकाही दाखल केली आहे. त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर बेंझीन आढळलेल्या ब्रँडची नावेही देण्यात आली आहेत.

बऱ्याच हँड सॅनिटायजर हे जेल असल्याचंही वॅलिसरला आढळून आलं आहे. वॅलिसरच्या निष्कर्षांची पडताळणी Yale विद्यापीठाच्या केमिकल रिसर्च सेंटरच्या लॅबने केली आहे. त्यानंतर बुधवारी वॅलिसरने एफडीएकडे यावर कारवाईची मागणी केली आहे. 

बेंझीनची मात्रा मोठ्या प्रमाणावर आढळलेले ब्रँड
1. artnaturals    
2. Scentsational Soaps & Candles Inc.    
3. huangjisoo    
4. TrueWash    
5. The Creme Shop    
6. Star Wars Mandalorian    
7. Body Prescriptions    
8. Born Basic
9. beauty concepts
10. PureLogic
11. Miami Carry On
12. Natural Wunderz
13. clean-protect-sanitize
14. Puretize
15. Hand Clean 100

वॅलिसरने एफडीएकडे दाखल केलेल्या त्यांच्या याचिकेत म्हटलं आहे की, संशोधनातून समोर आलेल्या निष्कर्षानुसार ही एक धोक्याची घंटा आहे, लोकांच्या जीवाशी खेळलं जात असल्याचंही यात म्हटलं आहे. याआधीही मोठ्या प्रमाणावर ब्लड कॅन्सरला कारणीभूत असलेले घटक शोधले होते. सॅनिटायझरमध्ये बेंझीन कसं आलं हे अद्याप समोर आलेलं नाही. 

2019 मध्ये वॅलिसरने रक्तदाबावर उपाचारासाठी घेतल्या जाणाऱ्या औषधामध्ये कार्सिनोजेन शोधलं होतं. डीएमएफ हे औषध तयार करण्याच्या सुरुवातीच्या प्रकियेमध्ये वारण्यात येत होतं. त्यानंतर एफडीएचं याकडे लक्ष वेधलं होतं. बेंझीन हे कर्करोगाला कारणीभूत असलेल्या सर्वात धोकादायक अशा केमिकल्सपैकी एक असून त्याची तपासणी लॅबमध्ये करण्यात आली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com