Coronavirus:कोरोनामुळे अमेरिकेत एकाचा मृत्यू; व्हायरसची लागण झाली कोठून?

टीम ई-सकाळ
रविवार, 1 मार्च 2020

कोरोना व्हायरस चीन, जपना, दक्षिण कोरियासह दक्षिण आशियातील अनेक देशांमध्ये पसरला आहे. आता, इराणसह युरोपातील देशांमध्येही कोरोनाची लागण झालेले रुग्ण आढळले आहेत.

न्यूयॉर्क : चीनमध्ये कोरोना व्हायरसने कहर केला असताना, आता अमेरिकेतही कोरोना व्हायरसनं शिरकाव केलाय. दरम्यान, कोरोना व्हायरसची सुरुवात नेमकी कोठून झाली याविषयी शंका उपस्थित केली जात आहे. चीनमधील हुबेई प्रांत सध्या कोरोनाचं केंद्र मानलं जात असलं तरी, कोरोना व्हायरस चीनच्या बाहेरूनही आला असल्याचं सांगितलं जात आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

अमेरिकेत एकाचा मृत्यू
कोरोना व्हायरस चीन, जपना, दक्षिण कोरियासह दक्षिण आशियातील अनेक देशांमध्ये पसरला आहे. आता, इराणसह युरोपातील देशांमध्येही कोरोनाची लागण झालेले रुग्ण आढळले आहेत. या सगळ्यांत अमेरिकेमध्ये अद्याप कोरोनाची एकही केस आढळलेली नव्हती. परंतु, आता अमेरिकेतही चौघांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालंय. या चौघांना कोरोनाची लागण कोठून झाली याची मात्र माहिती अद्याप मिळालेली नाही.  दरम्यान, कोरोनाची लागण झालेल्या एकाचा अमेरिकेत मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. अमेरिका सरकारनेही त्याला दुजोरा दिला आहे. उपलब्ध माहितीनुसार, चौघांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर वॉशिंग्टन राज्यात एकाचा कोरोनामुळं मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. राज्यातील किंग काऊंटीमध्ये हा प्रकार घडला आहे. इथं सात लाख लोकसंख्या असल्यामुळं सगळ्यांनाच जणू धडकी भरली आहे.

आणखी वाचा - असा आहे पीक विमा; खरचं आनंदाची गोष्ट 

आणखी वाचा - दिल्लीत शाहीन बागमध्ये जमाव बंदी आदेश; आंदोलन मोडून काढणार?

ट्रम्प घेणार पत्रकार परिषद 
मिळालेल्या माहितीनुसार, कॅलिफोर्निया प्रांतात एका व्यक्तीला कोरोनाची लागणी झाली आहे. पण, त्या व्यक्तीने चीन किंवा इतर कोरोनाग्रस्त कोणत्याही देशात प्रवास केलेला नाही. त्यामुळं अधिकच संभ्रम निर्माण झाला आहे. इटलीतील ला रिपब्लिका या वर्तमानपत्राने दिलेल्या माहितीनुसार इटलीत कोरोगाग्रस्त व्यक्तीचा मृत्यू झाला. पण, तो व्यक्ती चीनच्या कोणत्याही व्यक्तीच्या संपर्कात आलेली नाही. कोरोनाची अमेरिका सरकारने गंभीर दखल घेतली असताना, आता अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प या विषयी पत्रकार परिषद घेणार असल्याचे समजते.

थोडक्यात महत्त्वाचे

  • ट्रम्प सरकारकडून इराण, इटली आणि दक्षिण कोरियाला प्रवास करण्यावर निर्बंध
  • अमेरिकी नागरिकांना यापूर्वीच चीन आणि जपानला प्रवास करण्यावर निर्बंध
  • दक्षिण कोरिया, फ्रान्स आणि कतारमध्ये आढळले आणखी कोरोनाग्रस्त रुग्ण
  • चीननंतर दक्षिण कोरिया, इराणमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण 
  • अमेरिकेत कोरोनामुळे मृत्यू झालेली व्यक्ती महिला असल्याचे स्पष्ट

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus usa one person dies confirmed by washington state