कोरोनोला हरवण्यासाठी लस तयार; अमेरिकेने तयार केलेल्या पहिल्या लसीची यशस्वी चाचणी

covid-19 test
covid-19 test

न्यूयॉर्क : कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले असताना अमेरिकेतून एक चांगली बातमी आली आहे. कोरोना व्हायरस विरोधात लढण्यासाठी तयार करण्यात आलेल्या पहिल्या लसची चाचणी माणसांवर करण्यात आली असून त्याचे निकाल सकारात्मक आले आहेत. त्यामुळे कोरोनासारख्या जीवघेण्या आजारापासून मानवजातीची सुटका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

बोस्टन स्थित बायोटेक कंपनी मॉर्डनाने ही लस तयार केली आहे. mRNAलसची चाचणी सहभागी व्यक्तींवर करण्यात आली होती. अशा व्यक्तींची प्रतिकार क्षमता चांगली वाढली असून त्याचे साईड ईफेक्टही साधारण होते, अशी माहिती मॉर्डना कंपनीने सोमवारी दिली आहे.  mRNA 1273 नावाची लस ज्या सहभागी व्यक्तींना देण्यात आली होती त्यांच्या शरिरात साधारण दुष्परिणाम दिसले. शिवाय लसचा प्रभाव सुरक्षित आणि सहन करण्यासारखा होता. तसेच लस देण्यात आलेल्या व्यक्तींची प्रतिकारशक्ती Covid-19 मधून बरे झालेल्या व्यक्तींसारखी किंवा त्यांच्यापेक्षा अधिक पाहायला मिळाली असल्याचं मॉडर्नाकडून सांगण्यात आले आहे. आपण यापेक्षा अधिक चांगल्या निकालाची अपेक्षा करु शकत नाही, अशी प्रतिक्रिया मॉर्डनाचे सीईओ स्टीफन बैंसल यांनी दिली आहे.

आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अमेरिकेच्या मॉर्डना कंपनीने लस बनवण्यात गुंतलेल्या अन्य कंपन्यांना मागे टाकले आहे. मॉर्डनाने लस तयार करण्यासाठी महत्वाचे असणारे जेनेटिक कोड मिळवण्यापासून माणसांवर चाचणी करण्याचा काळ केवळ 42 दिवसात पूर्ण केला आहे. तसेच प्राण्यांवर परिक्षण करण्यापूर्वी माणसांवर परिक्षण करण्याचे पहिल्यांदाच घडले आहे. 16 मार्चला ही लस दोन मुलांची आई असणाऱ्या 43 वर्षीय जेनिफर नावाच्या महिलेला देण्यात आली होती. लसीच्या परिक्षणासाठी सुरुवातीला 18 ते 55 वर्षांच्या 45 व्यक्तींचा समावेश करण्यात आला होता. त्यातील 8 व्यक्तींनाच ही लस देण्यात आली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

लस देण्यात आल्यानंतर सुरुवातीला याचे काही साधारण दुष्परिणाम पाहायला मिळाले. जसे की, लस टोचलेली जागा लाल होणे, टोचलेल्या जागी थंडपणा वाटणे. मात्र, हे सर्व साईड ईफेक्टस अनेक लसींमध्ये सर्वसामान्य असतात, असं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. लस देताना कमी, मध्यम आणि अधिक अशी मात्रा ठरवण्यात आली होती. मात्र, कमी आणि मध्यम मात्रेमध्ये लसने चांगले परिणाम दाखवले आहेत. त्यामुळे जास्त मात्रेची आवश्यकता नसल्याचं सांगण्यात आलं आहे. या लसीमध्ये Covid-19 ला रोखण्याची क्षमता असल्याचे मॉर्डनाकडून सांगण्यात आल्याने आशा पल्लवित झाल्या आहेत.

लसीचे तीन सत्रात परिक्षण करण्यात येणार आहे. पहिल्या सत्राचे परिक्षण झाले आहे. दुसऱ्या टप्प्यातील 600 व्यक्तींवरील परिक्षण लवकरच होणार असून तिसऱ्या टप्प्याचे परिक्षण जूलै अखेर होईल असं अनुमानित आहे. अमेरिकेच्या एफडीएने मॉर्डनाला संमती दिल्याने या वर्षाच्या शेवटी किंवा 2021च्या सुरुवातीला ही लस उपलब्ध होण्याची शक्यता आहे. दरम्यान, Covid-19 च्या संबंधातील या चांगल्या बातमीने वॉल स्ट्रीटमध्ये उत्साह संचारला आहे. तसेच मॉर्डना कंपनीचे शेअर 30 टक्क्यांनी वधारले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com