आम्ही तुमच्याकडून 9 कोटी डोस घेऊ; लस निर्मिती आधीच या देशाने केला करार

कार्तिक पुजारी
Monday, 20 July 2020

कोरोना विषाणूविरोधात लस निर्मितीचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. जगभरातील वैज्ञानिक आणि डॉक्टर यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करत आहे. काही लस कोरोनावर प्रभावी ठरत असल्याचं दिसून येत आहे.

लंडन- कोरोना विषाणूविरोधात लस निर्मितीचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. जगभरातील वैज्ञानिक आणि डॉक्टर यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करत आहे. काही लस कोरोनावर प्रभावी ठरत असल्याचं दिसून येत आहे. यातच ब्रिटनने तब्बल 9 कोटी लस खरेदीचा करार तीन कंपन्याशी केला आहे. शिवाय ब्रिटन लसीच्या चाचणीसाठी 5 लाख स्वयंसेवक सहभागी व्हावेत यासाठीही प्रयत्न करत आहे.

दिल्लीच्या AIMS मध्ये मानवी चाचणीला सुरुवात; जाणून घ्या महत्त्वाची माहिती
Pfizer Inc.,BioNTeck SE आणि Valneva SE या तीन कंपन्यांसोबत ब्रिटनने करार केला आहे. Pfizer आणि BioNTeck या दोन कंपन्या 3 कोटी लस ब्रिटनला पुरवणार आहेत. तसेच परवानगी मिळाल्यास 10 कोटी डोस या वर्षाच्या शेवटपर्यंत तयार करण्याची कंपनीची योजना आहे.  Valneva  कंपनीने 6 कोटी लसीचे डोस देण्याचे मान्य केले आहे. 

फ्रेंचची alneva कंपनी कोरोनावरील लस निर्मितीच्या कामात गुंतली आहे. जर कंपनीची लस कोरोना विषाणूवर प्रभावी ठरली तर आम्ही 4 कोटी डोस या कंपनीकडून घेऊ, असं ब्रिटनने स्पष्ट केलं आहे. अमेरिकेने कोरोना विषाणूवर लस निर्मितीच्या कामात असणाऱ्या अनेक कंपन्यांना मदत केली आहे.  Pfizer आणि BioNTeck या कंपन्यांना अमेरिकेचे ऑफरेशन वार्प स्पीट या योजनेअंतर्गत 10 बिलियन डॉलरची मदत केली आहे. याबदल्यात कंपन्यांनी अमेरिकेला सर्वात आधी लस देण्याचे मान्य केले आहे.

रशियात एप्रिलमध्येच आली कोरोनाची लस; पुतीन यांच्यासह अब्जाधीशांनी घेतलीही!
जगभरात सध्या 120 पेक्षा अधिक कोरोना विषाणूवर प्रभावी ठरतील अशा लसींचे परिक्षण सुरु आहे. यातील काही कंपन्यांनी यात आघाडी घेतली आहे. अमेरिकेची मॉडर्ना आणि ब्रिटनच्या ऑक्सफर्ड विद्यापीठाने दुसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणींचे परिक्षण सुरु केले आहे. त्यामुळे या कंपन्या लवकरच चांगली बातमी देण्याची शक्यता आहे. संयुक्त अरब अमिरातीने चीनला सोबत घेऊन तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणी सुरु करुन मोठी मुसंडी मारली आहे. यूएईने तिसऱ्या टप्प्यात 15 हजार स्वयंसेवकांवर कोरोना लसीची चाचणी घेतली आहे. रशियाकडूनही दुसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणी पार पडत आहे. त्यामुळे या वर्षाच्या शेवटपर्यंत एक प्रभावी लस हाती येण्याची शक्यता आहे.

जगभरात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. भारतातही कोरोनाबाधित रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. भारतात कोरोनाग्रस्तांचा आकडा 11 लाखांच्या पुढे गेला आहे. स्वदेशी भारत बायोटेक कंपनी लस निर्मिती


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The country has agreed to buy 90 million doses of the corona vaccine