थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधातच अटक वॉरंट; वाचा कोणत्या देशाने केली हिंमत

वृत्तसंस्था
मंगळवार, 30 जून 2020

बगदादमध्ये इराणचे लष्कर प्रमुख कासीम सुलेमानी यांना ड्रोन हल्ला करुन मारण्यात आले होते. याप्रकरणी इराणने डोनाल्ड ट्रम्प आणि इतर 30 जणांविरोधात अटक वॉरंट काढला आहे.

वॉशिंग्टन- इराणने अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केला आहे. तसेच इंटरपोलने यासंदर्भात मदत करावी असं आवाहन केले आहे. बगदादमध्ये इराणचे लष्कर प्रमुख कासीम सुलेमानी यांना ड्रोन हल्ला करुन मारण्यात आले होते. याप्रकरणी इराणने डोनाल्ड ट्रम्प आणि इतर 30 जणांविरोधात अटक वॉरंट काढला आहे. तसेच न्याय मिळेपर्यंत हा खटला सुरु ठेवणार असल्याचं म्हटलं आहे.

कृष्णवर्णीय महिलेमुळे अमेरिकेच्या अंतराळवीराचे उड्डाण शक्‍य
इराणने अटक वॉरंट जारी केला असला तरी ट्रम्प यांना यापासून काहीही धोका नाही. मात्र, इराण आणि अमेरिकेतील संबंध यामुळे आणखी चिघळणार आहेत. अमेरिकेने तेहरान अनु करारातून माघार घेण्याचा निर्णय घेतला होता. तसेच इतर देशांनाही या करारातून माघार घेण्याचे आवाहन केले होते. तेव्हापासून उभय देशातील संबंध टोकाला गेले आहेत.  

जानेवारी महिन्यात इराणचे लष्कर प्रमुख कासीम सुलेमानी यांचा अमेरिकेने केलेल्या ड्रोन हल्ल्यात मृत्यू झाला होता. इराणने डोनाल्ड ट्रम्प यांना जबाबदार धरत त्यांच्या विरोधात कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे या हल्ल्यासाठी जबाबदार असणाऱ्यांविरोधात इराणने अटक वॉरंट जारी केला आहे. तसेच डोनाल्ड ट्रम्प अध्यक्ष पदावरुन पायउतार झाल्यानंतरही त्यांच्या विरोधात खटला सुरु ठेवणार असल्याचं इराणकडून सांगण्यात आलं आहे. 

चिनी अ‍ॅपवरील बंदीचा काय होणार परिणाम? जाणून घ्या..
तेहरानचे फिर्यादी अली अल्कासिमर यांनी ट्रम्प आणि इतर 30 जणांना हल्लासाठी जबाबदार धरले आहे. तसेच या प्रकरणात इंटरपोलने मदत करवी असं म्हटलं आहे. मात्र, फ्रान्सस्थित इंटरपोलने यासंदर्भात प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, अली यांनी ट्रम्प यांना रेड नोटीस पाठवण्याची मागणी इंटरपोलकडे केली आहे. त्यामुळे इंटरपोल यावर काही हालचाल करते का हे पाहावं लागेल.  

कासीम सुलेमानी यांनी अमेरिकेविरोधात कठोर भूमिका घेतली होती. तसेच वारंवार त्यांनी अमेरिकेला हल्ल्याची धमकी दिली होती. याच सुमाराच अमेरिकेकडून बगदाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर करण्यात आलेल्या ड्रोन हल्लात सुलेमानी यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध अत्यंत स्फोटक बनले होते. इराणने प्रत्युत्तर म्हणून इराकमधील अमेरिकी सैन्यावर बॅलेस्टिक हल्ला केला होता. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The country has issued arrest warrants against Donald Trump