या देशाने करात केली तिप्पट वाढ; श्रीमंतांवर आणखी कर लावण्याची शक्यता

वृत्तसंस्था
बुधवार, 13 मे 2020

सौदी अरेबियाने  व्हॅट ५ टक्क्यांवरून १५ टक्क्यांवर नेला आहे. सौदी अरेबियाचे अर्थमंत्री मोहम्मद अजदान यांनी सांगितले की, जगभरातून खनिज तेलाची मागणी कमी झाली आहे. सौदी अरेबिया जगातील सर्वात मोठा तेलाचा निर्यातदार देश आहे. परिणामी सौदीची संपूर्ण अर्थव्यवस्था तेलाच्या निर्यातीवर अवलंबून आहे. याचा सौदीच्या अर्थव्यवस्थेवर  परिणाम झाला आहे. सरकारने सार्वजनिक खर्चात कपा त करण्याचा निर्णय घेतला आहे.

रियाध - सौदी अरेबियाने वस्तू आणि सेवांवरील मूल्यवर्धित करात (व्हॅट) तीनपट वाढ केली आहे. कोरोनामुळे जगभरातील विविध देशांच्या अर्थव्यवस्था बिकट अवस्थेतून जात आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

सौदी अरेबियाने  व्हॅट ५ टक्क्यांवरून १५ टक्क्यांवर नेला आहे. सौदी अरेबियाचे अर्थमंत्री मोहम्मद अजदान यांनी सांगितले की, जगभरातून खनिज तेलाची मागणी कमी झाली आहे. सौदी अरेबिया जगातील सर्वात मोठा तेलाचा निर्यातदार देश आहे. परिणामी सौदीची संपूर्ण अर्थव्यवस्था तेलाच्या निर्यातीवर अवलंबून आहे. याचा सौदीच्या अर्थव्यवस्थेवर  परिणाम झाला आहे. सरकारने सार्वजनिक खर्चात कपा त करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय श्रीमंत व्यक्तींवर आणखी कर लावला जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Coronavirus : न्यूयॉर्क जून अखेरपर्यंत बंद राहणार - बिल डी ब्लासिओ

सरकारने वर्ष २०१८ मध्ये लागू केलेले सर्व भत्ते थांबविण्यात आले असून नागरिकांना निर्वाह योजनेअंतर्गत मिळणारा भत्ता देखील बंद करण्यात येणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अर्थव्यवस्थेचे विकेंद्रीकरण

  • सौदी अरेबियाने अर्थव्यवस्थेचे तेलावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी विविध उपाय योजना केल्या आहेत. मात्र अजूनही सौदीच्या अर्थव्यवस्थेत तेलाच्या विक्रीतून मिळणार महसूल सर्वाधिक आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर ३० डॉलर प्रतिबॅरल खाली आले आहेत. याचा फटका सौदी अरेबियाच्या अर्थव्यवस्थेला बसला आहे. 
  • लॉकडाऊनमुळे मुस्लिम धर्मियांचे तिर्थस्थळ असलेले मक्का आणि मदिना देखील बंद आहेत. परदेशी नागरिक सौदी अरेबियात असल्याने त्यातून देखील मोठा महसूल मिळतो. 
  • सौदी अरेबियाच्या महसुलात घसरण झाल्याने वर्षाच्या पहिल्या सहामाहीत महसुलात ३० टक्क्यांची घसरण झाली आहे. 
  • सौदी अरेबियाचे अर्थमंत्री मोहम्मद अल जादान म्हणाले, ‘‘संपूर्ण जग एका गंभीर समस्येचा सामना करत आहे. ते आधुनिक जगाने कधीही बघितलेले नाही. सगळीकडे अनिश्चिततेचे वातावरण आहे. सध्या आम्ही काही कठोर निर्णय घेत आहोत, मात्र ते अर्थव्यवस्थेच्या स्थिरतेसाठी लाभदायक ठरतील.’’

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The country has tripled its taxes likely to impose more taxes on the rich