Coronavirus : न्यूयॉर्क जून अखेरपर्यंत बंद राहणार - बिल डी ब्लासिओ

New-York
New-York

न्यूयॉर्क - अमेरिकेत सध्या कोरोनाचा विषाणू धुमाकूळ घालत असून कोरोनाच्या अमेरिकेतील साथीचे केंद्र असणारे न्यूयॉर्क शहर जून अखेरपर्यंत राहण्याची शक्यता न्यूयॉर्कचे महापौर बिल डी ब्लासिओ यांनी व्यक्त केली आहे. 

गेल्या काही दिवसात शहरातील नवीन बाधितांचा आकडा मोठ्या प्रमाणात घटला असून मृतांचे प्रमाणही कमी झाले आहे. त्यामुळे १५ मे पासून येथील तीन प्रांतांमधील लॉकडाउन उठवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, कोरोनाचा प्रसार पुन्हा होण्याची शक्यता लक्षात घेऊन येथील लॉकडाउनही वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती महापौरांनी दिली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

देशातील कोरोनाबाधितांचा आकडा सातत्याने वाढत आहे. त्याचबरोबर देशातील मृतांचा आकडाही वाढताना दिसून येतो आहे. त्यामुळे आत्ताच आम्ही लॉकडाउन उघडण्यास तयार नाहीत. म्हणून जून महिन्यापर्यंत लॉकडाउन वाढवणेच योग्य असेल असे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. दरम्यान, न्यूयॉर्क शहरात आत्तापर्यंत ३ लाख ३७ हजार ५५ जणांना कोरोनाची लागण झाली असून २६ हजारांपेक्षा अधिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याची माहिती येथील आरोग्य अधिकाऱ्यांनी मंगळवारी दिली. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com