esakal | अरब राष्ट्रात अणु उर्जा प्रकल्प सुरु करण्याचा मान 'या' देशाला
sakal

बोलून बातमी शोधा

uae-nuclear-plant.jpg

तेलाच्या बाबतीत संपन्न असलेल्या यूनायटेड अरब अमिराती येथे अणु उर्जा प्रकल्प उभारला जाणार आहे. विशेष म्हणजे अरब राष्ट्रातील हा पहिला अणु उर्जा प्रकल्प आहे.

अरब राष्ट्रात अणु उर्जा प्रकल्प सुरु करण्याचा मान 'या' देशाला

sakal_logo
By
वृत्तसंस्था

अबु धाबी- तेलाच्या बाबतीत संपन्न असलेल्या यूनायटेड अरब अमिराती येथे अणु उर्जा प्रकल्प उभारला जाणार आहे. विशेष म्हणजे अरब राष्ट्रातील हा पहिला अणु उर्जा प्रकल्प आहे. अणु उर्जा एजेंसीचे देशाचे प्रवक्ते हमद अलकाबी यांनी ट्विट करुन याबाबतची माहिती दिली आहे. यूएईच्या पहिल्या बारखा अणु उर्जा प्रकल्पाला सुरुवात करण्यास परवानगी मिळाल्याचं त्यांनी सांगितलं आहे. 

नवीन शैक्षणिक धोरणही चीनच्या विरोधात!

हा एक ऐतिहासिक क्षण असून मैलाचा दगड आहे. यूएई आता नवीन आणि स्वच्छ उर्जेच्या क्षेत्रात पाऊल ठेवत आहे, असं अलकाबी म्हणाले आहेत. त्यांनी ट्विटरवर एक फोटो शेअर केला असून प्रकल्पाचे तंत्रज्ञ या घटनेचा उत्सव साजरा करताना दिसत आहेत. 

यूएईचे प्रमुख आणि दुबईचे शासक शेख मोहम्मोद बीन रशिद अल-मक्तूम यांनीही ट्विट करुन प्रतिक्रिया दिली आहे. इंधन आणण्यात, व्यापक चाचण्या घेण्यात आणि प्रकल्प यशस्वीपणे राबवण्यात आपल्याला यश आल्याचं ते म्हणाले आहेत. उर्जा क्षेत्रातील ऐतिहासिक उपलब्धीबद्दल आणि शाश्वत उर्जेत मैलाचा दगड गाठल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन, असंही ते म्हणाले आहेत. 

यूएईने बारखा उर्चा प्रकल्पात फेब्रुवारी महिन्यापासून इंधन आणणे सुरु केले होते. त्यानंतर नियमकांनी हिरवा झेंडा दाखवल्यानंतर पहिला अणु उर्जा प्रकल्प व्यावसायिक वापरासाठी सुरु करण्यात आला आहे. हा प्रकल्प अबु दाबीच्या पश्चिम किनाऱ्यावर आहे. अणु उर्जा प्रकल्पासाठी यूएई 2017 पासूनच तयारी करत होता. मात्र, वेळोवेळी सुरक्षेच्या कारणासाठी याला वेळ लागत होता. आता प्रकल्पाचे काम लवकरच सुरु होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. प्रकल्प सुरु झाल्यानंतर त्यातून प्रथम विद्युत उर्जा निर्माण केली जाणार आहे. 

नवीन शैक्षणिक धोरण विद्यार्थ्यांसाठी आशादायी!

यूएईमध्ये मोठ्या प्रमाणात तेलाचे साठे आहेत. असे असली तरी भविष्याचा वेध घेत यूएईने आपली उर्जा भूक भागवण्यासाठी स्वच्छ उर्जा प्रकल्पात मोठ्या प्रमाणात  गुंतवणूक केली आहे. सौर उर्जेमध्येही देशाने मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. 

दरम्यान, जगातील सर्वाधिक तेल साठे असणारा देश सौदी अरेबिया यानेही अणु उर्जा प्रकल्प उभा करण्याची मनिषा व्यक्त केली आहे. मात्र, प्रकल्प सुरु करण्याबाबत काही ठोस कृती त्यांच्याकडून झालेली नाही.

(edited by- kartik pujari)