esakal | जॉर्डनमध्ये ऑक्सिजन अभावी 6 जणांचा मृत्यू; आरोग्यमत्र्यांनी दिला होता राजीनामा

बोलून बातमी शोधा

Jordan

पंतप्रधान बिशर अल खासानेह यांनी आरोग्यमंत्री ओबीदत यांना या दुर्घटनेबद्दल राजीनामा द्यायला सांगितले होते, त्यानंतर ओबीदत यांनी नैतिकता पाळत पंतप्रधानांकडे राजीनामा दिला.

जॉर्डनमध्ये ऑक्सिजन अभावी 6 जणांचा मृत्यू; आरोग्यमत्र्यांनी दिला होता राजीनामा
sakal_logo
By
वृत्तसंस्था

Corona Updates : अम्मान : चीनच्या वुहानमधून बाहेर पडलेल्या कोरोना व्हायरसने जगभरातील सर्वच देशांच्या तोंडचं पाणी पळवलं आहे. अनेक देशांनी लॉकडाउन, कर्फ्यू यांसारखी बंधनं लादली आहेत. गेल्यावर्षीपेक्षा या वर्षी कोरोनाचा कहर कैक पटीने वाढलेला आकडेवारीवरून दिसून येतो. कोरोनाला रोखण्यासाठी जगभरातील सर्वच देशांनी विविध उपाययोजना राबविल्या आहेत. परदेशी वाहतुकीवर निर्बंध घातले आहेत.

हेही वाचा: न्यायाच्या दिशेने पाऊल!

सर्वच देशांमध्ये कमी-अधिक प्रमाणात रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे ऑक्सिजन तसेच कोरोना प्रतिबंधक लसींचा तुटवडा निर्माण होत आहे. अनेक ठिकाणी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांना ऑक्सिजन न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. दरम्यान, अशाच एका दुर्घटनेनंतर देशाच्या आरोग्यमंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा महिन्याभरापूर्वी दिला होता. ही घटना घडली होती जॉर्डन या देशात. ऑक्सिजन अभावी सहा जणांना आपला जीव गमवावा लागल्यानंतर जॉर्डनचे संवेदनशील आरोग्यमंत्री नाथिर ओबीदत यांनी राजीनामा दिला. रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर संतप्त नातेवाईकांनी हॉस्पिटलबाहेर गोंधळ घालण्यास सुरवात केली होती. त्यांना रोखण्यासाठी पोलिस तैनात करण्यात आले होते, अशी माहिती तेथील माध्यमांनी दिली होती.

हेही वाचा: अवकाश स्थानक गजबजले अंतराळवीरांनी

पश्चिम अम्मानच्या न्यू साल्ट गव्हर्नमेंट हॉस्पिटलमधील अतिदक्षता, प्रसूती आणि कोरोना व्हायरस वॉर्डमधील ऑक्सिजन संपला. त्यामुळे सहा जणांना आपला जीव गमवावा लागला. पंतप्रधान बिशर अल खासानेह यांनी आरोग्यमंत्री ओबीदत यांना या दुर्घटनेबद्दल राजीनामा द्यायला सांगितले होते, त्यानंतर ओबीदत यांनी नैतिकता पाळत पंतप्रधानांकडे राजीनामा दिला. ऑक्सिजनच्या पुरवठ्यात आलेल्या अडथळ्यामुळे सहा जणांचा मृत्यू झाला, असे प्राथमिक तपासणीत दिसून आले आहे, अशी माहिती ओबीदत यांनी दिली होती. दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर जॉर्डनचे राजे अब्दुल्ला यांनी हॉस्पिटलला भेट दिली होती.

हेही वाचा: विमानात बसले तेव्हा १८८ जण निगेटिव्ह; उतरले तेव्हा ५२ जणांना कोरोना

जॉर्डनमध्ये कोरोना संसर्ग वाढू लागल्याने कडक उपाययोजना राबविण्यास तेथील सरकारने सुरवात केली. १ कोटीच्या घरात लोकसंख्या असलेल्या जॉर्डनमध्ये ७ लाख ६ हजार ३५५ कोरोना रुग्ण आढळले असून ८ हजार ७०७ जणांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे भारतात गेल्या काही दिवसांपासून दिल्ली, महाराष्ट्र, झारखंड, पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. हॉस्पिटलबाहेर रुग्णवाहिकांच्या रांगा लागल्या आहेत, लोकांना बेड मिळेना झालेत, ज्या राज्यात रुग्णसंख्या वाढत आहे, त्या राज्यात पुरेसा लसींचा आणि इतर गोष्टींचा पुरवठा केला जात नाहीय. याकडे केंद्र सरकार आणि प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप राज्य सरकारांकडून केला जात आहे.