कोरोना विषाणूच्या प्रोटिनची पुनर्रचना; नवे संशोधन लसीच्या उत्पादनासाठी उपयुक्त 

पीटीआय
Saturday, 25 July 2020

अमेरिकेतील ऑस्टिनमधील टेक्सास विद्यापीठातील संशोधकांनी म्हणण्यानुसार कोरोनाच्या मुख्य प्रोटिनचे अस्तिस्त मानवी रोगप्रतिकारक प्रणालीतून जाणवावे, असे प्रयत्न कोरोनावरील लसींच्या संशोधनात होत आहेत.

ह्यूस्टन -  मानवी शरीरात प्रवेश करणाऱ्या आणि आतील पेशींना संसर्ग पोचवणाऱ्या कोरोनाच्या विषाणूंमधून मुख्य प्रोटिनची पुनर्रचना शास्त्रज्ञांनी प्रयोगशाळेत केली आहे. या नव्या शोधामुळे कोरोनावरील लसीचे उत्‍पादन वेगात आणि स्थिर पद्धतीने होण्यास मदत होणार आहे. या प्रोटिनला ‘हेक्साप्रो’ असे नाव दिले आहे. 

अमेरिकेतील ऑस्टिनमधील टेक्सास विद्यापीठातील संशोधकांनी म्हणण्यानुसार कोरोनाच्या मुख्य प्रोटिनचे अस्तिस्त मानवी रोगप्रतिकारक प्रणालीतून जाणवावे, असे प्रयत्न कोरोनावरील लसींच्या संशोधनात होत आहेत. या संबंधी ‘सायन्स’ या नियतकालिकामध्ये लेख प्रसिद्ध झाला असून त्यातील माहितीनुसार शास्त्रज्ञांनी या प्रोटिनची नवी रचना तयार केली आहे. सध्‍याच्या विविध लसींमध्ये वापरल्या जाणाऱ्या ‘एस’ प्रोटिनपेक्षा हे नवे प्रोटिन पेशीत दहापटीने जास्त तयार होऊ शकते. या प्रोटिनमुळे लसीच्या प्रकारांनुसार त्याच्या प्रत्येक मात्रेचे प्रमाण कमी होऊ शकते किंवा लसींचे उत्पादन वेगाने होण्यास मदत होऊ शकेल आणि अधिकाधिक रुग्णांना लस लवकर उपलब्ध होऊ शकेल, असे या अभ्यासलेखाचे मुख्य लेखक जॉन्सन मॅक्सलेलन यांनी सांगितले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

अँटिबॉडिज चाचणीसाठी मदत 
संशोधकांच्या मतानुसार कोरोनाच्या अँटिबॉडिज चाचणीत ‘हेक्साप्रो’चा वापर केला जाऊ शकतो. रुग्णाला पूर्वी विषाणूचा संसर्ग झाला आहे का हे निदर्शनास आणून त्याच्या रक्तात अँटिबॉडिज आहेत की नाही हे तपासण्यासाठी या प्रोटिनचा उपयोग होऊ शकतो. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Covid-19 Coronavirus protein redesigned

Tags
टॉपिकस
Topic Tags: