China Corona Outbreak : चीनमुळे जगाची डोकेदुखी वाढली, पुढच्या 40 दिवसांमध्ये 200 कोटी... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

China Corona News

China Corona Outbreak : चीनमुळे जगाची डोकेदुखी वाढली, पुढच्या 40 दिवसांमध्ये 200 कोटी...

China Covid-19 Updates : चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक झाल्याचं मीडिया रिपोर्टनुसार पुढे येत आहे. परंतु चीन सरकार हे आकडे जाहीर करत नाही. परंतु पुढच्या ४० दिवसांमध्ये चीनमुळे जगावर संकट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

चीनच्या परिवहन मंत्रालयाच्या अंदाजानुसार पुढच्या ४० दिवसांमध्ये २०० कोटींपेक्षा अधिक लोक देशात प्रवास करु शकतात. नव्या वर्षाच्या अनुषंगाने चीममध्ये लोक एकमेकांना भेटतात. ४० दिवस ही यात्रा चालते. त्यामुळे कोरोना संक्रमण वाढण्याची शक्यता आहे.

चीन सरकार कोरोनाची माहिती लपवत असलं तरी शी जिनपिंग यांनी मागे अधिकाऱ्यांची एक बैठक बोलावली होती. त्या बैठीकीतील तपशील पुढे आला होता. त्यांनी बैठकीमध्ये आपल्याला जीव वाचवावे लागतील, असं सांगून मिशन मोडवर काम करण्यास सांगितलं होतं.

त्यानंतर चीनमधल्या काही रुग्णालयातले व्हीडिओ समोर आले होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर मृतेदहांचा खच झाल्याचं निदर्शनास येत होतं. शिवाय रुग्णालयांमध्ये स्टाफची कमतरता भासत असल्याचं समोर आलेलं होतं. यासह स्मशानभूमीच्या बाहेर अंत्यसंस्कारासाठी लागलेल्या रांगाही दिसत होत्या.

'लूना न्यू ईयर' असं या सेलिब्रेशनचं नाव आहे. शनिवारपासून ही यात्रा सुरु झाली. मोठ्या प्रमाणावर लोक एका जागेवरुन दुसऱ्या ठिकाणी जातात. २१ तारखेपासून तर चीमध्ये त्यासाठी सुट्ट्या सुरु होत आहेत. २०२० नंतर पहिल्यांदा चीनमध्ये हे सेलिब्रेशन होणार आहे. त्यामुळे जगावर संकट येण्याची शक्यता असल्याचं सांगितलं जात आहे.

टॅग्स :ChinaCoronavirus